देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापुर्वी शेतकरी(Farmer) शेणखत (manure), कंपोस्ट खत(Compost manure,), गाळाचे खत, पेडींचा वापर, पिकाची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष परिणाम पिकांवर तसेच जमिनीत दिसुन येऊ लागला. पर्यायाने पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य व गांडुळ मित्राचे आस्तितवच धोक्यात आले त्यामुळे रासायनिक खताबरोबर शेतीला वरदान असणारी काही खते बनवण्याची पद्धत 13 वर्षाच्या संशोधनानंतर एका शेतकऱ्यांनी जोपासली आहे. सॉईल मल्टीप्लायर गांडुळ खत बनण्याची पद्धतही पीक उत्पादन वाढीसाठी अगदी सोपी आणि फायदेशीर आहे.
गांडुळ खत म्हणजे काय ?
गांडुळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करुन सेंद्रिय पदार्थापासुन तयार झालेले खत म्हणजे सॉईल मल्टीप्लायर गांडुळ खत होय. यात नत्र, स्फुरद, पालाश, संजिवके, कॉल्शीअम आणि सुक्ष्मद्रव्य इत्यादीचे प्रमाण शेणखतापेक्षा अधिक असते यात गांडुळाचे अंडीपुंज असुन उपयुक्त जिवाणु आणि प्रती जैविके असतात.
गांडुळाची जात व जीवन क्रम:
1. इसीनिया फिटेडा:- सरासरी आयुष्यमान 3 ते 4 वर्षे त्या जातीचे प्रजनन हे वर्षभर चालते. ती विष्ठा ही रेतीच्या स्वरुपात टाकते. ओलाव्याचे प्रमाण 30 ते 35 टक्के राखते. या जातीच्या गांडुळाचा रंग हा गर्द लाल असतो. या जातीची लांबी 3 ते 4 इंच इतकी असते.
2. युड्रेलिस युजेनी:- सरासरी आयुष्मान हे 1 ते 1.5 वर्षे या जातीचे प्रजनन वर्षभर चालते. ती विष्ठा दाणेदार गोळ्यांच्या स्वरुपात टाकते. ओलाव्याचे प्रमाण 30-35 टक्के राखते. या जातीच्या गांडुळाचा रंग हा तांबुस तपकिरी असतो. या जातीची लांबी 4-5 इंच इतकी असते.
• गांडुळाचे खाद्य
हे खत तयार करत असताना गांडुळाना व्यावस्थीत अन्न पुरवणे महत्वाचे आहे. त्यामुळ गांडुळाची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाणे, कापलेले गवत, तण, काडी-कचरा, पाला-पाचोळा, भाज्यांचे टाकाऊ भाग, कंपोस्ट खत, शेण खत, लेंडी खत इ. पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत.
• गांडुळाची काळजी (Worm care in marathi)
गांडुळ हा प्राणी स्व:ताचे रक्षण स्व्त: करु शकत नाही त्यामुळे त्याचे बेडुंक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, मुंग्या, कोंबड्या, ह्या शत्रुपासुन रक्षण करावे. जमीनीमध्ये घातक रसायनांनचा वापर टाळावा.
• गांडुळ खताचे फायदे:
1. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
2. मातीची पाणी निचरा होण्याची क्षमता वाढते.
3. जमीनीचे भौतिक, जैविक गुणधर्म सुधारतात व उत्पादनात वाढ होते.
4. संतुलीत अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
5. जमीनीची धुप थाबंते.
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
Share your comments