1. कृषीपीडिया

दुष्काळी परिस्थितीत सिलिकॉनचा वापर ठरतो फायद्याचा

KJ Maharashtra
KJ Maharashtra
use of silicon

use of silicon

 पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी जसे नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते त्याप्रमाणेच पिकांना सिलिकॉन सुद्धा आवश्यक असते. जर आपण सिलिकॉनचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला तर अपेक्षित उत्पादन साध्य करणे शक्‍य होते. सिलिकॉन हे प्रामुख्याने ऊस, गहू, मक्का फळपिके व बहुवार्षिक इतर भाजीपाला पिकात उपयुक्त आहे.

  • सिलिकॉन च्या वापरामुळे वाढते पिकांची रोगप्रतिकारक क्षमता: वनस्पतींच्या पेशीभित्तिका वर सिलिकॉनचे आवरण तयार होत असल्याने तेल्या,भुरी, डाऊनी वेगवेगळ्या ठीपके व बुरशी यांचे बीजाणू पेशीमध्ये शिरकाव करीत नाही. पेशीभित्तिका या कडक झाल्याने बीजाणू पोषक वातावरणात देखील आक्रमण करीत नाहीत. त्यामुळे त्यांची वाढ होत नाही व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • सिलिकॉन च्या वापराने पिकाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया वाढते: सिलिकॉनचा वापरामुळे पानाच्या आकारमान वाढते. पाने सरळ ताठ होतात व त्यावर अधिक सूर्यकिरणे पडतात त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो. अन्ननिर्मिती वाढल्याने व उत्पादनात वाढ होते.
  • सिलिकॉन व पाण्याचा घनिष्ठ संबंध: उन्हाळ्यामध्ये किंवा कोरडवाहू भागात जेथे पाण्याचा पुरवठा कमी असतो तेथे सिलिकॉनचा वापर केल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. यामुळे दुष्काळी परिस्थितीत देखील पिके तग धरू शकतात.
  • सिलिकॉन व कीड नियंत्रण: टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची इत्यादी भाजीपाला पिकांवर मावा, तुडतुडे, कोळी, फुलकिडे त्यांच्यासाठी पेशीभित्तिका टॅंक झाल्याने विषाणूजन्य रोगांचा अटकाव होतो.
  • सिलिकॉन व कांदा पिकाच्या संबंध: कांदा रोगामध्ये झिंक सल्फेट आणि सल्फर सोबत जर सिलिकॉनचा वापर केला तर कांद्यामध्ये येणाऱ्या करपा रोगा विरुद्ध सिलिकॉन छान काम करते.
  • सिलिकॉन व डाळिंब: डाळिंबामध्ये येणाऱ्या मर रोगासाठी व तेल्या रोगासाठी सिलिकॉनचा एकरी 20 किलो ग्रॅम वापर पहिल्या पाण्यासोबत दिल्यास योग्य निष्कर्ष पाहण्यास मिळाले आहेत. तसे डाळिंबाच्या आकार, दर्जा, फळांचा रंग इत्यादी  मध्ये छान बदल होतो. फुल गळ कमी होऊन फळांची साल चिवट मजबूत होऊन टिकवण क्षमता वाढते. उन्हामुळे पडणारे काळे डाग कमी होतात.
  • सिलिकॉन व द्राक्ष परस्पर संबंध: द्राक्ष बागेमध्ये नुकसान असणाऱ्या जैविक अजैविक घटकांचा संबंध येतो तेथे सिलिकॉनचा वापरने द्राक्षबागेचे संरक्षण होते. द्राक्ष बागेत सिलिकॉन वापरल्यामुळे लुसन आयसोलुसीन या प्रथिनांची निर्मिती व वाढ होते त्यामुळे द्राक्षातील करपा, भुरी, डाऊनी इत्यादी  रोगास प्रतिबंध होतो. द्राक्ष मण्याची साल मजबूत बनल्याने फळ तडकणे, फळगळ होणे कमी होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters