1. कृषीपीडिया

कृषी शेतकरी गटाचा विषमुक्त सेन्द्रीय शेतीचा वापर.

कोरोनाच्या काळात गावातील काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी रासायनिक विषमुक्त शेतीकडून एकात्मिक सेंद्रिय शेती करून अनोखा पुढाकार घेतला आहे. जे इतर शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कृषी शेतकरी गटाचा विषमुक्त सेन्द्रीय शेतीचा वापर.

कृषी शेतकरी गटाचा विषमुक्त सेन्द्रीय शेतीचा वापर.

शेती करताना सतत निसर्गाचा अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकरी व इतर अडचणींमुळे शेतीतील उत्पादन खर्च वाढून लाभांश कमी होत आहे. एकात्मिक सेंद्रिय शेती शेतीतील लाभांश टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा गट तयार करून एकात्मिक सेंद्रिय शेती करत आहे.

यामध्ये शेतीसाठी संकरित बियाणांचा वापर आणि रासायनिक खते, कीटकनाशकांच्या बेसुमार अति वापरामुळे भाजीपाल्याची चव नष्ट होऊन त्याचा परिणाम आपल्या आरोग्यालाही मोठ्या प्रमाणात होत असून आता हे नुकसान आपण पाहत आहोत. परतूं नागरी समुदायाच्या निकषामध्ये अप्रगत समजल्या जाणाऱ्या दक्षिण राजस्थान मधील आदिवासी समुदाय सेन्द्रीय जैविक शेतकरी गट स्थापन करुन आपली वाटचाल विषमुक्त सेन्द्रीय शेतीकडे करीत आहेत.या मध्ये वागधारा संस्थाच्या पुढाकाराने हे शेतकरी आपले उत्पादन खर्च कमी करुन एकात्मिक शेती पध्दतीने आपली उपजिविका सबळ करीत आहेत .

या अंतर्गत बांसवाडा जिल्ह्यातील आनंदपुरी, कुशलगढ ब्लॉकमधील वागधारा स्थापित 210 सेंद्रिय शेतकरी गटात 1060 शेतकरी बांधव आहेत. हा शेतकरी गट एकत्र येऊन विषमुक्त, शेती करत आहे. आणि या शेतकऱ्यांनी एकात्मिक सेंद्रिय शेतीचा वापर करून नवा आदर्श मांडला आहे. विशेषतः भातशेतीमध्ये पाथरिया तांदूळ, जिरे तांदूळ, झिनी, काळी कमोद कोलंबो, आणि बाजरी, कुरी,हमली, आणि मका दूध मोगरा, गंगडी या नामशेष होत चाललेल्या पारंपरिक बियांचे जतन करून त्यांची लागवड करत आहेत. या पारंपारिक बियाण्यांमध्ये भरपूर पौष्टिकता आहे आणि स्थानिक उत्पादनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने वागधारा संस्था विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने काम करत आहे. एकात्मिक शेती पध्दतीद्वारे पौष्टिकदृष्ट्या समृद्ध पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, संस्था वेळोवेळी पारंपारिक पिके आणि बियाण्यांशी संबंधित माहिती सामायिक करते.

या आदिवासी भागातील 1060 शेतकऱ्यांची संघटन तयार करून त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करत आहेत.

या पद्धतींचा अवलंब करून ड्रम सीडर, ईएसआरडी, विषमुक्त, रसायनमुक्त आणि कीटकनाशकांचा वापर थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळेच संस्था या शेतकऱ्यांना कंपोस्ट खत, गांडुळ खत, तसेच गोमूत्र, दश पर्णी, ब्रम्हास्त्र, डी कंपोस्टर, जीवामृत बनविण्याचे प्रशिक्षण देवुन प्रशिक्षित करीत आहे .

कीटकनाशकामुळे आपला मित्र आणि शत्रू दोघेही मरतात. आणि हे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत मित्रकिडला वाचवणे खूप गरजेचे आहे. मानगढ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ही संस्था शेतकऱ्यांकडून थेट त्यांच्या कृषी उत्पादनातील डाळी खरेदी करून मध्यस्थांची साखळी तोडत आहे. यामध्ये आपल्या मानगड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

 संस्थेचे कृषी तज्ज्ञ पी.एल. पटेल म्हणतात की ही शेतकरी उत्पादक कंपनी या आदिवासी भागात मैलाचा दगड ठरत आहे, कारण आम्ही मध्यस्थांची साखळी तोडत आहोत आणि शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देत आहोत.

यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा मिळत असून त्यांच्या पारंपारिक बियाणे ज्यामध्ये मुबलक पोषक तत्वे आहेत, त्यांचा अन्नात वापर करून कुपोषणापासून मुक्ती मिळवता येईल. यामध्ये त्यांचे जीवनमानही वाढते आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते.

आदिवासी भागात संपूर्ण स्वराज्य आणण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.

 

 विकास परशराम मेश्राम

कार्यक्रम अधिकारी वागधरा

English Summary: Use of non-toxic organic farming by agri-farmer group Published on: 13 November 2021, 07:39 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters