1. कृषीपीडिया

रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा .

ह्या वर्षी हवामानातील बदल आणि अधिक पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा .

रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा .

ह्या वर्षी पाऊसअधिक झाल्याने विहिरी, बोअरवेल, धरणे, शेततळे व इतर जलस्रोतांमध्ये पाण्याचा साठा भरपूर उपलब्ध आहे शेतकर्‍यांनी ह्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे असे मला वाटते.

खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. कापूस वेचणीने वेग घेतला आहे, शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करीत असतील. 

मित्रांनो, रब्बी हंगामातील पिकांचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर पारंपारिक मोकळ्या पाण्यावर, पाटपाणी पद्धतीने ते मिळू शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

खुप जादा पाणी दिल्याने खुप उत्पादन मिळते असा शेतकर्यांचा गैरसमज आहे, मित्रांनो असे कधीच होत नाही. पिकांच्या संपूर्ण कालावधीमध्ये पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात फक्त वाफसा पाहिजे असतो ते मोकाट सिंचन पद्धतीमध्ये शक्य होत नाही. पाण्याचा अपव्यय होतो तसेच दिलेली खतेही झिरपून जातात, विजेचा वापर ही जास्त होतो आणि आपण लोड शेडिंगच्या नावाने तक्रार करीत असतो.

मित्रांनो म्हणुनच थोडासा गांभीर्याने विचार करा गेली कित्येक वर्ष आपण पारंपारिक पद्धतीने मोकाट सिंचन पद्धतीने रब्बी हंगामातील पिके घेत आलो आहोत, उत्पादन कमी मिळते व त्यापासून नफा कमी मिळतो. मित्रांनो आता आपली मानसिकता बदलली पाहिजे. रब्बी हंगामातील सर्व पिकांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा म्हणजे ठिबक सिंचन अथवा रेन पोर्ट सिंचन / तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे म्हणजे विक्रमी उत्पादन मिळेल आर्थिक नफा जास्त मिळेल. मित्रांनो, शेती हा व्यवसाय म्हणुन केल्यास त्यात गुंतवणूक तर करावी लागेल.

शेती करताना वापरण्यात येणाऱ्या सर्व निविष्ठांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीवर गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे कारण सूक्ष्म सिंचन पद्धती अधिक वर्ष फायदा देतात तर बाकी निविष्ठां फक्त एकच वर्ष, एकच हंगामापूरते वापरता येतात.

रब्बी हंगामात गहु, हरभरा, मका, कांदा, काकडी, टरबूज, खरबूज, भुईमूग, ऊस, सूर्यफुल, करडई, मोहरी ही पिके घेतात, ह्या सर्व पिकांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करता येईल.

कोणत्या पिकासाठी कोणत्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावयाचा व कसा वापर करावयाचा ह्या बाबतीत आम्ही तंत्रज्ञान विकसीत केले आहे. रब्बी हंगामातील वर उल्लेख केलेल्या सर्व पिकांच्या अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन पद्धती चा वापर करून विक्रमी उत्पादन मिळवावे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि 1963 पासून शेतकर्‍यांच्या सोबत काम करीत असून शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांचे उत्पादन वाढवून त्यांच्यासाठी समृद्धी आणण्यासाठी मदत करीत आहेत. 

रब्बी हंगामातील पिकासाठी सर्व पिकांचे विक्रमी उत्पादन कसे काढावे ह्याचे प्रगत तंत्रज्ञान जैन इरिगेशन सिस्टिम्स लिकडे उपलब्ध आहे. 

अधिक माहिती साठी आमच्या स्थानिक प्रतिनिधी किंवा जैन ठिबक सिंचनचे विक्रेत्यां कडे सम्पर्क करावा.

रब्बी हंगामातील पिकांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी शुभेच्छा. 

 

- डॉ. बी डी जडे

डॉ. बी डी जडे, ९४२२७७४९८१.

वरिष्ठ कॄषीविद्या शास्त्रज्ञ,

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

English Summary: Use micro-irrigation method for rabi season crops and get record yield. Published on: 30 October 2021, 07:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters