सेंद्रिय शेती’ सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास रसायनांचा वापर टाळून व पर्यावरणीय जीवनचक्रास समजून घेऊन केलेली एकात्मिक शेतीपद्धती होय. ‘सेंद्रिय शेती’ ही अशी उत्पादनपद्धती आहे, ज्यामध्ये रासायनिक पदार्थांना मग ती खते कीटकनाशके, तणनाशके किंवा प्राणिमात्रांचे खाद्य, या कोणत्याही स्वरूपात त्यांच्या वापरावर बंदी असते. या पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट, पिकांच्या अवशेषांचा वापर, प्राणिमात्रांचे मलमूत्र, जैविक कीडनियंत्रण इ. गोष्टींवर भर देऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली जाते. लॅम्पकीन (१९९०) यांच्या म्हणण्यानुसार निसर्गाकडून आपण जे घेतले ते निसर्गाला परत देणे म्हणजेच ‘सेंद्रिय शेती’ होय.
२००४ च्या आकडेवारीनुसार जगात २४० लक्ष हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात होती व तीच आकडेवारी आपण २००६ मध्ये बघितली तर ३१० लक्ष हेक्टर पोहोचली.
म्हणजे दोनच लाख ७० लाख हेक्टर क्षेत्र भरली आणि आज घडीला ४३७ लक्ष हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आहे (यात सेंद्रिय शेतीच्या मार्गाची देखील क्षेत्र आहे). सद्यःस्थितीनुसार १७२ हून अधिक देशांत सेंद्रिय शेती केली जात आहे.
भारतातील सेंद्रिय शेतीचा विचार करणे योग्य ठरल्यास जगामध्ये अगदीच नागण्य आहे. संस्थान संस्थांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये भारतामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ०.३० टक्के क्षेत्र सेंद्रिय शेती खाली होती.
दरम्यानच्या काळात भारत सरकारने विविध योजना राबवल्या व त्याचे फलित म्हणजे भारताची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल होत आहे व त्याची टक्केवारी दरवर्षी वाढत आहे. या सर्व प्रयत्नामुळे सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारे राज्य बनले. भारतात लागवडीखालील एकूण क्षेत्र १४३ मिलियन हेक्टर आहे. त्यातील मार्च २०१४ पर्यंत ४.७२ मिलियन हेक्टर एवढे क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली होते (यात सेंद्रिय शेतीच्या मार्गावरील क्षेत्रदेखील आहे) व २०१५-१६ मध्ये हेच ५.७१ मिलियन हेक्टर एवढे झाले.
यावरून भारतीय शेतकऱ्यांचा व नागरिकांचा कल हा हळूहळू सेंद्रिय शेतीकडे व आरोग्याच्या हेतूने चांगला दिसून येत आहे. हे प्रमाण ३.५ टक्क्यांच्या वर जात नाही, तरीही हे आपणा सर्वांसाठी नक्कीच दिलासा देणारे चित्र आहे.
सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे व मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणे महत्त्वाचे आहे.
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८
ध्येय मातीला वाचवणं
Save the soil all together
Share your comments