यावर्षी रब्बी हंगामातही कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. रब्बी हंगामातील पिकांपेक्षा कडधान्यांचे दर अधिकचे असल्याने शेतकऱ्यांनी या नगदी पिकावर भर दिला आहे. सर्वकाही पोषक असले तरी लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन झाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी केलेला बदल यशस्वी होण्यासाठी आता कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेतला आहे.
उत्पादनात वाढ व्हावी, याअनुषंगाने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना कडधान्याचे सुधारित वाण, खतांचे योग्य नियोजन आणि रोग व्यवस्थापन या त्रिसुत्रांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे.
हरभरा पिकाचे व्यवस्थापन
हरभरा क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून पहिल्या पेऱ्यातील हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे, तर दुसरीकडे पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थापन करताना हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेमी पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे 25 ते 30 दिवसांनी द्यावे. 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे लागते.
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहीत ठेवावे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी लागते. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर एक खुरपणी केल्यास पीक बहरणार असल्याचे परभणी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रशांत भोसले यांनी केले.
कीड व रोग व्यवस्थापन
हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे अधिकतर नुकसान होते. पीक 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. अशावेळी लिंबोळीच्या 5 टक्के द्रावणाची एक फवारणी करावी लागणार आहे. यानंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. पक्षांना बसायला जागोजागी T आकाराचे सापळे उभे करावे लागणार आहे. जेणेकरुन त्यावर चिमण्या, सांळुक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात. अशाप्रकारे हेक्टरी 5 फेरोमेनचे सापळे लावावेत.
Share your comments