सापळा पिकं आपल्या मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना ’सापळा पिके' म्हणतात.
आता ते महत्वाचं का आहे?सापळा पिकांमुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते. बऱ्याचदा किडीस अधिक प्रमाणात बळी पडणारे एखादे पीक अल्पशा क्षेत्रावर मुख्य पिकापूर्वी घेतल्यास त्याकडे मोठ्या प्रमाणावर किडींना आकर्षून त्यांचे नियंत्रण करता येते.सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे.
मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी.
सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात.
काही सापळा पिकांच्या विक्रीतून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्याचाही विचार व्हावा.
सापळा पिकाची लागवड करताना त्यांची वाढ कशी होते? त्यांना जागा किती लागते? त्यांचा जीवनक्रम, मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश याबाबतीत त्यांची होणारी स्पर्धा या गोष्टींचा अभ्यास करावा. सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, याला ‘पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग (पी.टी.सी.)’ असे म्हणतात. एखाद्या किल्ल्याच्या सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तशीच ही पद्धत असते. सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादीवरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या ठरविता येते.
सापळा पिकाचे फायदे
मित्रकीटकांचे व पक्ष्यांचे संवर्धन होते.
पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
पिकाचे उत्पादन आणि प्रत सुधारता येते.
सापळा पिकापासून अधिकचे उत्पादन घेता येते.
माती व पर्यावरणाचे संवर्धन होते.
झेंडूमुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होते. झेंडूपासून उत्पन्न मिळते.
मुख्य पिकाचं उत्पन्न घातल्यास चवळी व मक्याचे उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळा टोमॅटोपेक्षाही चवळी व अन्य आंतरपिकांचे उत्पन्न जास्त मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
चवळीवरील मित्रकीटक उदा. लेडीबर्ड बीटल, मावा, तुडतुडे हे शत्रुकिडींचा फडशा पडतात.
मक्यावर क्रायसोपर्ला हा मित्रकीटक वाढतो.तो माव्याची एक हजारापेक्षांही जास्त अंडी फस्त करतो.
मक्याच्या उंच पिकावर पक्षी बसतात. ते पिकांवरील अळ्या व किडींना खातात.
ज्वारी, मक्याच्या फुलावर माव्याचे व बोंड अळीचे शत्रुकीटक उदा. ट्रायकोग्रामा, क्रायसोपा, लेडीबर्ड, बीटल आदी वाढतात. त्यामुळे जैविक व्यवस्थापन होते.मुख्य पीक,त्यातील योग्य सहयोगी मिश्र पिके
भात : ग्लीरीसिडीया, मका, चवळी
सोयाबीन : मका, तीळ, धने, मेथी
तूर : भोवताली एरंडी, सूर्यफूल (सापळा पिके)
कापूस : मका, तूर, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू हरभरा, भुईमूग
ऊस : धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भूईमूग, चवळी
गहू : मोहरी, झेंडू, मका, कोथिंबीर
भूईमूग : मका, तूर, मिरची, धने, हरभरा, चवळी, घेवडा, सूर्यफूल
हळद : मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी
सापळा पिकाची पेरणी
सापळा पिके शेतात लावून मित्रकीटकांची संख्या वाढवता येते. अशी सापळा पिके कापूस, टोमॅटो व भाजीपाला पिकांत घेतल्यास लेडीबर्ड बीटल, क्रायसोपर्लासारखे मित्रकीटक वाढतात. मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, मका, राळा, झेंडू अंबाडी, सूर्यफूल आदी पिकांचा अंतर्भाव केल्यास शेतात मित्रकीटक व पक्षांची जोपासना होते. दक्षिणोत्तर पेरणीचे महत्त्व
शेत मोठे असेल तर दक्षिणोत्तर दिशेने ठरावीक अंतरावर जैविक बांध (गजराज गवत ओळ) घातले तर कार्बन डायऑक्साईड वायू अडेल व झाडांच्या वाढीला मदत करेल. पिकांची पेरणी दक्षिणोत्तर केल्याने उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या चुंबकीय परिणामामुळे (Polar Magnetic effect) पिकाच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो. चुंबकीय लाटांमुळे (Magnetic resonance waves) पिकांचे उत्पादन वाढते असा शास्राज्ञांचा दावा आहे.
मिलिंद गोदे
अचलपूर
जैविक शेतकरी
Share your comments