टमाटा हे असे पीक आहे ज्याची मागणी बाजारात कायम असते. टमाट्याची शेती कशी वर्षभर केली जाते परंतु हा महिनाटमाटे लागवडीसाठी योग्य असतो. त्यामुळे वेळेवर व्यवस्थित नियोजन करून जरटोमॅटोचे उत्पादन घेतले तर चांगला नफा मिळू शकतो.
टमाट्याच्या शेती च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी टोमॅटो च्या विविध प्रकारच्या जाती विकसित करण्यात आले आहेत.
यासाठी टोमॅटो लागवडीच्या अगोदर तुम्ही कोणत्या प्रकारचे जात लावत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक जातीची वेगवेगळे विशेषता असते.भारतीय सब्जी अनुसंधान संस्थान वाराणसी या संस्थानने टोमॅटोच्या विविध प्रकारच्या जाती विकसित केल्या आहेत. या लेखात आपण टोमॅटोच्या काही प्रगत जातींची माहिती करून घेणार आहोत.
टोमॅटोच्या प्रगत जाती
देशातील वेगळ्या प्रकारचे संस्थान आणि कृषी महाविद्यालय यांनी टोमॅटोच्या विविध प्रकारच्या जाती विकसित केल्या आहेत. या लेखात आपण भारतीय सब्जी अनुसंधान संस्थान ने विकसित केलेल्या काही जाती पाहणार आहोत.
- काशीविशेष–
ही जात टोमॅटो वर येणार्या टोबॅको लिफ कर्ल व्हायरस ला प्रतिकारक्षम आहे. या जातीचे झाड मजबूत आणि गडद हिरव्या रंगाचे असते आणि टोमॅटो चे फळ लाल, गोलाकार, मध्यम आकार तसेच त्याचे वजन 80 ग्रॅम पर्यंत असते.ही जात 70 ते 75 दिवसांत काढणीस तयार होते. या जातीपासून प्रति हेक्टरी चारशे ते साडेचारशे क्विंटल उत्पादन मिळते. ही जात जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश,उत्तरांचल, पंजाब,उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांसाठी विकसित केली गेली आहे.
- काशीअमृत:
टमाट्याची या जातीचे फळ गोल आणि लाल रंगाचे असते. फळाचे वजन 108 ग्राम असते. ही जात सुद्धा टोब्याकोलिफकर्लवायरस या रोगास प्रतिकारक्षम आहे. ती प्रति हेक्टर जवळजवळ 620 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. ही जात युपी, बिहार आणि झारखंड या राज्यांसाठी विकसित केली गेली आहे.
- काशीहेमंत:
या जातीचे झाड हे मजबूत आणि त्याचे फळ गोल आणि आकर्षक लाल रंगाची असते. त्याच्या फळाचे वजन हे 80 ते 85 ग्राम असते. या जातीपासून हेक्टरी 400 ते चारशे वीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. ही जात खास करून छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश साठी विकसित केली गेली आहे.
- काशीशरद:
या जातीच्या झाडाचे पाणी हे रुंद आणि फळ अंडाकार तसेच आकर्षक लाल रंगाचे असते. या जातीचा टोमॅटो लवकर खराब होत नाही. फळाचे वजन हे 90 ते 95 ग्राम असते तसेच प्रति हेक्टरी उत्पादन चारशे ते पाचशे क्विंटल मिळते. ही जात विशेषतः जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडया राज्यांसाठी विकसित केली गेली आहे.
- काशीअनुपमा:
या जातीची फळे लाल रंगाचे असून मोठे, चपटे गोलाकार असते. लागवडीनंतर हे 75 ते 80 दिवसांनी तयार होते. यापासून प्रति हेक्टरी 500 ते 600 क्विंटल उत्पादन मिळते.ही जात प्रामुख्याने राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांसाठी विकसित केली गेली आहे.
Share your comments