टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते. तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसखाली गेले, तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.
पिकास इजा होऊन उत्पादनात मोठी घट येते. जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील, तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो फळांची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो. चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते.
हलक्या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते. उन्हाळी टोमॅटो पीक हलक्या व उथळ जमिनीत घेऊ नये. जमिनीचा सामू ६ ते ७.५ दरम्यान असावा. क्षारयुक्त चोपण व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते.
'सरकारचा प्राधान्य हरित विकास', अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या मोठ्या घोषणा
जमिनीत चर काढले तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षारांचाही निचरा होतो. अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके (वांगी, मिरची इ.) घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड-रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच सूत्रकृमीग्रस्त जमिनीत हे पीक घेऊ नये.
केळीच्या दरात तेजी, शेतकऱ्यांना दिलासा..
दरम्यान, अनेकदा टोमॅटोला बाजारभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. असे असले तरी चांगला माल आणि मोठे उत्पादन मिळाले तर यामधून देखील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते, त्याचे काय झाले? अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना केवळ स्वप्न दाखवले? अर्थसंकल्पात भरीव काहीही नाही..
Budget 2023 Agriculture : पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी अर्थसंकल्पात २० लाख कोटींची तरतुद
Share your comments