कोरोना नंतर अर्थव्यवस्थेमध्ये जी आर्थिक सुस्ती आली आहे त्यामुळे सगळेजण समस्याग्रस्त आहेत. आता थोडी परिस्थिती ठीक होत आहे त्यामुळे प्रत्येक जण त्याचे उत्पन्न कसे मिळेल या धडपडीत आहे.प्रत्येकाची आपले उत्पन्न दुप्पट व्हावे अशी इच्छा असते. शेती हे हे एक क्षेत्र आहे यामध्ये भरपूर प्रयोग करण्याला वाव आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि पिकांची लागवड करून व त्याला तंत्रज्ञानाची उत्तम प्रकारे जोड देऊन कमी खर्चात सुद्धा जास्त नफा मिळवता येऊ शकतो. अशाच प्रकारचे एक वनस्पती आहे चंदन. चंदन लागवडी द्वारे शेतकरी लाखोरुपये कमवू शकता.
घेऊ चंदना च्या झाडाची माहिती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चंदनाची मागणी खूप प्रमाणात आहे. परंतु त्या मानाने त्याचा पुरवठा फार अत्यल्प आहे त्यामुळे चंदनाच्या किमतीमध्ये खूपच वाढ झाली आहे.
जर चंदनाच्या झाडाचा विचार केला तर चंदनाच्या झाडाला दोन प्रकारे उगवले जाते.
चंदनाच्या झाडाला जैविक पद्धतीने उगवण्यासाठी कमीतकमी दहा ते पंधरा वर्षे लागतात. परंतु पारंपारिक पद्धतीने एका झाडाला उगवण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 वर्षे लागून जातात.तसेच जनावरांपासून त्याचा बचाव करणे हे गरजेचे असते. चंदनाचा सुवास हार मनमोहक असल्याकारणाने जंगली जनावरे चंदनाच्या झाडाकडे आकर्षित होतात त्यामुळे झाडाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा जनावरांना चंदनाच्या झाडापासून दूर ठेवणे गरजेचे असते.चंदनाच्या झाडाचा विचार केला तर ते रेताड आणि बर्फाळ प्रदेश सोडला तर कुठल्याही जागेत उगवते.
चंदनाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधने तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. चंदनाची वाढती मागणी आणि उत्पादनामध्ये असलेली कमी त्यामुळे चंदनाच्या किमती गगनाला पोहोचले आहेत.
चंदनाच्या झाडाची आर्थिक गणित
जर एक वेळ चंदनाचे झाड लावले तर आठ वर्षानंतर त्याचे हर्डवुड तयार होणे सुरू होते.लागवडीनंतर बारा ते पंधरा वर्षानंतर त्याची कटाई करता येते.चंदनाचे झाड मोठे झाल्यानंतर शेतकरी प्रति वर्षे 15 ते 20 किलो लाकूड झाडापासून घेऊ शकतो. चंदनाच्या एका लाकडाची किंमत तीन ते सात हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.ते दहा हजार रुपयांपर्यंत सुद्धा प्रतिकिलो विकली जाते. IWST च्या अनु मानानुसार प्रतिहेक्टर चंदनाची शेतीसाठी जर पंधरा वर्ष कालावधी पकडला तर तीस लाख रुपये खर्च येतो. परंतु याचा रिटर्न हा एक ते दीड कोटी पर्यंत आहे. भारतामध्ये नाबाड सारखे बँक शेतकऱ्यांना चंदन शेती साठी सबसिडी आहे आणि कर्जाची सुविधा देतात.
Share your comments