सोयाबीनचे लागवड महाराष्ट्रामध्ये विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.मागच्या वर्षी सोयाबीन लाचांगला भाव मिळाल्यानेया वर्षी नक्की सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.
इतर पिकांप्रमाणेच सोयाबीन मध्ये सुद्धा चांगल्या उत्पादनासाठी चांगले वाण व बियाणे यांचे निवड शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते. जर निवडलेले वाण दर्जेदार असेल तरत्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस व दर्जेदार असते त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना जास्त उत्पादनातून चांगला नफा देखील मिळतो.
त्यासाठी सोयाबीन लागवडीच्या आधीचांगल्या वाणांची निवड शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते.आपण येथे काही सोयाबीनच्या नव्या संशोधन झालेल्या वाणांची माहिती घेणार आहोत.
सोयाबीनच्या नव्या सहा वाणांचे संशोधन
इंदोर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या पार पडलेल्या 52 व्या वार्षिक बैठकीतभारतातील उत्तर पर्वतीय,उत्तर मैदानी तसेच मध्य क्षेत्राकरिता सोयाबीनच्या नव्या सहा वाणांची शिफारस करण्यात आली.या नव्या वानांमध्ये अधिक उत्पादनक्षमता तसच येलोमोजॅक रोगाच्या विरोधात प्रतिकारक वाण यांचादेखील समावेश असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
1- भारतातील उत्तर पर्वती क्षेत्राकरिता वीएलएस-99, उत्तर मैदानी क्षेत्राकरिता एनआरसी-149तसेच मध्य क्षेत्राकरिता चार वाणांचा समावेश आहे.
2- मध्य क्षेत्राकरिता असलेल्या वानांमध्ये एनआरसी-152, एन आर सी 150, जेएस-21-72 तसेच हिम्सो-1689 हे वान असल्याची माहिती देण्यात आली.
3- यापैकी एन आर सी-149 हे वान येलो मोजेक, राइजोक्टोनिया एरियल ब्लाइट तसेच गर्डल बिटल व पाने खाणाऱ्या किडींना प्रतीकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
4- एन आर सी-150 हे वान अवघ्या 91 दिवसांत काढणीस तयार होते. यामधील विशिष्ट गंध येत असल्याने हे वाण अशा प्रकारचा वास येण्यासाठी जबाबदार असलेल्या लाइपोक्सीजिनेज-2एंजाइम मुक्त असल्याचे सांगण्यात आले.
5- एन आर सी 152 हेवाण 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीत काढण्यास तयार होते असा दावा संस्थेने केला आहे. तसेच खाद्यान्न म्हणून उपयुक्त आणि अपौष्टिक क्लनिटस, ट्रिपसिंग इनहीबिटर आणि लाइपोक्सिजिनेज-2 एन्झाईम मुक्त असल्याचे सांगण्यात आले.
तसेच जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबल्पुर द्वारा एक सोयाबीन वाण विकसित करण्यात आले असून हे वाण येलोमोजॅक, चार्कॉल रोट, बॅक्टेरियल पस्टूल तसेच लिफ्ट स्पोट व रोगांना प्रतिकारक असल्याची माहिती देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:रेश्मा नामक म्हशीची कमाल; ठरली देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस
नक्की वाचा:'या'सरकारने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय पण महाराष्ट्र सरकार घेईल का?
Share your comments