भारतातील शेती आता बदलत्या काळानुसार हायटेक बनत चालली आहे. शेतकरी राजा देखील आता काळानुसार स्वतःला बदलत आहे. आता शेतकरी स्मार्टफोनचा प्रभावी वापर करत आहे, शेती क्षेत्रात झालेल्या ह्या बदलामुळे बळीराजाचे उत्पन्न वाढत आहे. आता सर्वच क्षेत्रात स्मार्टफोनचा तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर लक्षणीय बघायला मिळत आहे. आता जवळपास सर्वच शेतकरी अँड्रॉइड फोनचा वापर करत आहेत. आता असे बाजारात अनेक अँप्लिकेशन लाँच झाल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना माहितीचे आदान प्रदान करणे, सोयीचे झाले आहे. अनेक अँप्लिकेशन हे शेतकऱ्यांना खुप उपयोगी पडणाऱ्या आहेत. म्हणून आज आपण अशा काही अँप्लिकेशन विषयी जाणुन घेणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना आता बाजारभाव, पिकाची माहिती, हवामान अंदाज, कृषी विषयी उपकरणे,इत्यादीची माहिती केवळ एका क्लिकद्वारे समजून जाते. त्यासाठी अनेक शासकीय तसेच प्रायव्हेट अँप्लिकेशन लाँच झाल्या आहेत, आज आपण त्यासंदर्भात विस्तृत माहिती जाणुन घेऊया.
Crop Insurance Android App
हि अँप्लिकेशन आपण प्ले स्टोर ह्या प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकता. हि अँप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी खुपच उपयोगाची ठरू शकते. हि अँप्लिकेशन कृषी विम्याची माहिती शेतकऱ्यांना पुरविते. ह्या अँपद्वारे विम्याचा हफ्ता, तपशील इत्यादी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते.
पुसा कृषी अँप्लिकेशन
शेती क्षेत्रात सर्वात महत्वाचे असते ते किडनीयंत्रण. जर वेळेवर किड नियंत्रण केले गेले नाही तर याचा परिणाम उत्पादनावर जाणवतो. हे अँप्लिकेशन आपल्याला कीटक नियंत्रण करण्यासाठी मदत करू शकते. हे देखील प्ले स्टोर वर आपणांस उपलब्ध होऊन जाईल.
किसान सुविधा
शेती व्यवसाय हवामानावर आधारित व्यवसाय आहे, जर हवामानाचा अचूक अंदाज बांधला गेला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे अँप्लिकेशन नावाप्रमाणे शेतकऱ्यांना सुविधा पुरविते. हे अँप्लिकेशन हवामानाचा अंदाज तर सांगतेच शिवाय बाजारभाव, डीलर्सची माहिती, पीक कीटक व्यवस्थापन इत्यादी माहिती शेतकऱ्यांना पुरविते.
Share your comments