भुईमूग या तीनही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे. ते सर्वात जुने तेलबिया पीक असून ची लागवड महाराष्ट्रात व देशातखरीप हंगामात घेतले जाते. परंतु तुलनेने उन्हाळी प्रमुख लागवडीचे क्षेत्र कमी असूनही उत्पादकता अधिक आहे. झाले का तापमान उन्हाळी भुईमूग लागवडीविषयी महत्वाची माहिती घेऊ.
उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान
पेरणीचा योग्य कालावधी
उन्हाळी भुईमूग लागवड साधारणतः 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी.
जमीन
भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असावी.वाळूमिश्रित, चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन हवी असते. या प्रकारच्या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते व शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
लागणारे आवश्यक हवामान
भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानातही वाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. तसेच पेरणीच्या वेळेस रात्रीचे तापमान 18 अंश डिग्री सेल्सियस पेक्षा कमी नसावे व त्या नंतरच्या दिवसांमध्ये दिवसाचे तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे.
बियाण्याचे प्रमाण
पेरणी करता सुमारे 100 ते 125 किलो बियाणे लागते. बियाण्याचे प्रमाण ठरविण्याकरिता सूत्र –
हेक्टरी झाडांची संख्या×100 दाण्यांचे वजन
हेक्टरी बियाणे किलो = उगवणशक्ती (%)×1000
तसेच उपट्या वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टर
बीजप्रक्रिया
बियाण्यास दोन किंवा तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात कार्बनडेंझिम बीजप्रक्रिया करावी व जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या घटकाची पाच ग्रॅम प्रति किलो व प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.
पेरणी पद्धत
पेरणी 30×10 सेंटीमीटर किंवा 30×15 मल्टीमीटर किंवा 45×10 सेंटीमीटर अंतरावर करावी. बियाणे पाच ते सहा सेंटीमीटर खोल पेरावे. पेरणीसाठी सरी वरंबा किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करावा.
खत व्यवस्थापन
पेरणीच्या वेळी संपूर्ण रासायनिक खताची मात्रा द्यावी. त्यामध्ये नत्र 25 किलो प्रति हेक्टर, स्फुरद 50 किलो प्रति हेक्टर तसेच जिप्सम 400 किलो प्रति हेक्टर वापरावे सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन पाच किलो प्रति हेक्टर पेरणी वेळी द्यावे.
तन व्यवस्थापन
पाच ते दहा आठवड्यापर्यंत पीक तणविरहित ठेवावे. मस्त नाशिक वापरायचे झाल्यास पेरणीनंतर 20 दिवसांनी इमॅझिथापरयाचा वापर दोन मिली प्रति लिटर पाण्यात वापरावे.
पाणी व्यवस्थापन
जमिनीनुसार साधारणतः उन्हाळी 15 ते 17 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पिकाची काढणी
साधारणपणे 80 ते 85 टक्के शेंगा परिपक्व झाल्यास,पाला पिवळा दिसू लागल्यावर वाढत्या टक्क्यांपर्यंत ओलाव्याचे प्रमाण खाली आल्यानंतर काढणे करावे.
उत्पादन
पंचवीस ते तीस क्विंटल वाळलेल्या शेंगा प्रति हेक्टरी पाच टन कोरडा पाला प्रति हेक्टर
Share your comments