सोयाबीन या पिकाची लागवड महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून सोयाबीन वर देखील इतर पिकांप्रमाणेच विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
यामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्यामुळे पिकाच्या खूप मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
कोवळ्या सोयाबीनचे अतोनात नुकसान या गोगलगायी करतात. त्यामुळे त्यांचे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण सोयाबीन वरील गोगलगाईंचे नियंत्रण कसे करायचे याबद्दल माहिती घेऊ.
सोयाबीन वरील गोगलगाईंचे नियंत्रण
आता सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोवळ्या सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते.
गोगलगायीचे प्रमुख खाद्य हे सेंद्रीय पदार्थ असतात. असे सेंद्रिय पदार्थ जर गोगलगाईंना मिळाले नाही तर ते कोवळ्या पिकाची पाने कुरतडायला लागतात.
त्यामुळे पिकाची वाढ थांबते. त्यामुळे यांचा वेळीच बंदोबस्त करणे खूप गरजेचे असते जेणेकरून भविष्यात होणारे पिकांचे नुकसान टाळता येते.
यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याला माहित आहेच कि यासाठी बाजारांमध्ये काही प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.
औषध शेताच्या बांधावर जरी टाकली तरी गोगलगाय नियंत्रण मिळवणे शक्य होते. यासाठी काही घरगुती औषध उपचार देखील तयार करता येतात.
हा उपाय ठरले फायदेशीर
सोयाबीनचे अतोनात नुकसान करणाऱ्या गोगलगाई पळवण्यासाठी बाजारात स्नलकेल नावाचे एक शेव सारखे औषध मिळते. हे औषध शेताच्या बांधाला टाकले तरी गोगलगायींचा प्रतिबंध होतो.
दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे गुळाच्या पाण्यात सोयाबीन किंवा गव्हाचे काड मिक्स करून त्यावर कीटकनाशक औषध टाकून हे मिश्रण शेताच्या बांधावर टाकले तरी गोगलगायींचा प्रतिबंध होऊ शकतो.
हे औषध घरच्या घरी तयार करता येते. पाऊस कमी झाल्यानंतर गोगलगायी कोवळ्या पिकांवर हल्ला चढवतात. गोगलगायींचा सगळ्यात मोठा धोका हा नव्याने पेरणी करण्यात येणाऱ्या पिकांवर जास्त असतो.
Share your comments