महाराष्ट्रमध्ये रब्बी हंगामात जास्त करून ज्वारीची पेरणी केली जाते. जर आपण ज्वारी पिकाखालील लागवड क्षेत्राचा विचार केला तर रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा नंतर ज्वारी या पिकाचा क्रमांक लागतो. ज्वारी पिकाचा धान्यासाठी आणि जनावरांना चाऱ्यासाठी असा दुहेरी उपयोग होत असतो. आपल्याला माहिती आहेच की कुठल्याही पिकापासून भरघोस उत्पादन हवी असेल तर व्यवस्थापन गरजेचे असतेच.
परंतु त्यापेक्षाही जास्त दर्जेदार जातींची निवड ही खूप महत्त्वाची असते. कारण शेतकरी बंधुंनी सुधारित आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींची निवड केली तर नक्कीच पिका पासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस मिळते. या लेखामध्ये आपण रब्बी हंगामात भरघोस उत्पादन देऊ शकणाऱ्या दोन सुधारित जातींची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
रब्बी हंगामात भरघोस उत्पादन देऊ शकणाऱ्या ज्वारीच्या जाती
1- फुले रेवती- ज्वारीचे ही जात रब्बी हंगामासाठी पेरणीस शिफारस करण्यात आली असून तुम्हाला जर बागायती क्षेत्रात पेरणी करायची असेल तर हा वाण योग्य आहे. या जातीपासून हेक्टरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
फुले रेवती या जातीच्या ज्वारीची पेरणी केल्यानंतर 118 दिवसात काढण्यात येते. समजा कोरडवाहू क्षेत्रांमध्ये जर या वाणाची लागवड करायची असेल तर मध्यम जमीन आवश्यक असल्याचा सल्ला दिला जातो. कोरडवाहू क्षेत्रांमध्ये 25 क्विंटल हेक्टरी उत्पादन देण्याची या जातीची क्षमता आहे.
2- पीकेव्ही क्रांती( एकेएसव्ही 13 आर)- ही जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विकसित केली असूनसंपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी अनुकूल आहे. ही जात मध्यम कालावधीत तयार होते व अधिक उत्पादन देण्याची क्षमता या जातीत आहे. या जातीच्या ज्वारीची कणसे आकाराने मोठी असतात व दाणे ठोकळ आणि चमकदार असतात. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जा तिकडे मालदांडी 35-1 या जातीला पर्याय म्हणून देखिल पाहिले जाते.
या ज्वारीची भाकर चवीला उत्कृष्ट असून बाजारात मोठी मागणी असते. ज्वारीच्या या जातीपासून एका हेक्टरमध्ये 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पेरणीनंतर 120 दिवसांत काढणीस तयार होते व मळणी करण्यासाठी देखील अतिशय सोपी अशी ही जात आहे.
नक्की वाचा:सेंद्रिय शेतीसाठी रासायनिक कीटकनाशकांची चिंता सोडा, कडुलिंबाचा हा पर्याय घरीच बनवा
Share your comments