1. कृषीपीडिया

Groundnut Veriety: शेतकरी बंधूंनो! या रब्बीत हवे भुईमुगापासून बंपर उत्पादन तर करा लागवड 'या' सुधारित जातींची, वाचा डिटेल्स

जर आपण भुईमूग या पिकाचा विचार केला तर हे एक उष्ण आणि आणि कोरड्या हवामानात येणारे पीक असून जर तापमान 18 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर हे पीक चांगले उत्पादन देते. उन्हाळी हंगामामध्ये 10 ते 12 तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकासाठी उपयुक्त ठरतो. जर तुमचा देखील भुईमूग लागवडीचे प्लान असेल तर त्यासाठी या लेखाच्या माध्यमातून आपण काही मुगाच्या सुधारित जातींची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
groundnut variety

groundnut variety

 जर आपण भुईमूग या पिकाचा विचार केला तर हे एक उष्ण आणि आणि कोरड्या हवामानात येणारे पीक असून जर तापमान 18 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर हे पीक चांगले उत्पादन देते. उन्हाळी हंगामामध्ये 10 ते 12 तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकासाठी उपयुक्त ठरतो. जर तुमचा देखील भुईमूग लागवडीचे प्लान असेल तर त्यासाठी या लेखाच्या माध्यमातून आपण काही मुगाच्या सुधारित जातींची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Tur Market Update: तुरीला आज 'या' बाजार समितीत मिळाला 8 हजार प्रतिक्विंटल दर, वाचा राज्यातील काही निवडक बाजार समितीतील आजचे तूरीचे भाव

 भुईमुगाच्या उत्पादनक्षम सुधारित जाती

1- टी..जी.-24- ही जात उपट्या प्रकारातील असून लागवडीनंतर 110 ते 115 दिवसांत काढणीस येते. या जातीचे 40 ते 45 किलो पेरणीसाठी बियाणे लागते. या जातीमध्ये तेलाचे प्रमाण 49 ते 50 टक्के असून एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळते.

2- कोयना(बी-95)- हि नीमपसऱ्या या प्रकारातील जात असून पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य आहे. लागवडीसाठी एकरी 45 ते 50 किलो बियाणे लागते व लागवडीनंतर 135 ते 140 दिवसांत काढणीस येते. या जातीच्या 100 दाण्यांचे वजन 80 ते 90 ग्रॅम असते. या जातीपासून एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.

नक्की वाचा:Soyabean Bajar Bhav:दिवाळीच्या तोंडावर देखील सोयाबीनच्या बाजारभावात वाढ नाही, वाचा आजचे बाजार भाव

3- आयसीजीएस-11- ही जात निमपसऱ्या प्रकारातील असून लागवडीनंतर 125 ते 130 दिवसांत काढणीस येते. या जातीपासून एका एकर मध्ये 12 ते 18 क्विंटल उत्पादन मिळते. या जातीची शिफारस संपूर्ण महाराष्ट्रभर लागवडीसाठी करण्यात आली आहे.

4- एम-13- हे जात मराठवाडा, सोलापूर, नागपूर व पुणे भागात लागवडीसाठी योग्य आहे. ही जात लागवडीनंतर 135 ते 140 दिवसांत काढणीस येते. या जातीपासून एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

नक्की वाचा:भारत युरिया बॅग आणि किसान समृद्धी केंद्रे सुरू, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

English Summary: this is some important and more productive groundnut crop variety Published on: 18 October 2022, 04:55 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters