जर आपण मिरची लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये थोड्याबहुत फरकाने मिरची लागवड होते. परंतु मिरचीचे अनेक जाती असून त्यातील शिमला मिरची या जातीची लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.बहुतेक शेतकरी बंधू पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून शिमला मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात.
कारण कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता शिमला मिरची या भाजीपाला पिकात आहे. जर आपण बाजारपेठेतील मागणीचा विचार केला तर जास्त करून हॉटेलिंगमध्ये शिमला मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.
उदाहरणच घ्यायचे झाले तर चायनीज बनवण्यासाठी अनेक रेस्टॉरंट वर देखील शिमला मिरचीचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ही फार उपयुक्त आहे.
शिमला मिरचीची लागवड शेतकरी बंधूनी करायची ठरवली तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच हे फायद्याचे पीक आहे. त्या अनुषंगाने आपण या लेखात सिमला मिरचीचा दोन महत्त्वपूर्ण जातींची माहिती घेणार आहोत.
सिमला मिरचीचे चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती
1-ऑरोबेल-जर आपण तज्ञांचा विचार केला तर त्यांच्या माहितीनुसार,सिमला मिरचीही सुधारित जात संपूर्ण भारतात लागवडीसाठी उपयुक्त आहे. नंतर ही जात फक्त थंड हवामानात चांगली वाढते. जेव्हा या जातीची मिरची पक्व होते तेव्हा मिरचीचा रंग पिवळा होतो आणि वजन सुमारे 150 ग्रॅम असते.
नक्की वाचा:या पिकाची शेती देते तुम्हाला हमखास उत्पन्न
तसेच रोगांना देखील बऱ्यापैकी प्रतिकारक असून हे मिरचीचे वाण हरितगृहामध्ये आणि खुल्या जमिनीवर देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंसाठी शिमला मिरचीची ही जात खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते.
2- अर्का गौरव- ही देखील सिमला मिरचीची एक बंपर उत्पादन देणारे सुधारित जात असून या जातीच्या मिरचीच्या झाडाची पाने पिवळी व हिरवी असून फळ जाड लगद्याचे असतात. या जातीच्या मिरचीचे वजन 130 ते 150 ग्रॅम पर्यंत असते.
फळांचा रंग ही मिरची पक्व झाल्यानंतर केशरी किंवा हलका पिवळा होतो. लागवडीनंतर 150 दिवसात ही जात काढणीस तयार होते. अर्का गौरव जातीच्या लागवडीतून प्रति हेक्टर सोळा टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळू शकते.
Share your comments