राज्यात ‘या’ फुलांची होते सर्वाधिक शेती; जाणून घ्या कोणत्या आहेत फुलांच्या जाती

16 October 2020 05:14 PM


भारतासारख्या विविधता असलेल्या देशात, धार्मिक परंपरांमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरांबाहेर होणारी फुलांच्या हाराची विक्री, विविध सण, समारंभात फुलांच्या गुच्छापासून सजावटीपर्यंत त्याचा होणारा वापर या गोष्टी त्याच्याच निदर्शक आहेत. चांगल्या-वाईट अशा कोणत्याही कार्यक्रमात फुले हमखास लागतातच. दररोजच्या मार्केटमधील वाढती मागणी पाहता फुलशेती हा सर्वात चांगला, नफा देणारा व्यवसाय आहे. देशपातळीवर फुल उत्पादनात पाचव्या क्रमाकांवर असलेले महाराष्ट्राला फुलशेतीत अग्रेसर स्थान मिळविण्याची अधिक संधी आहे.

रोजच्या मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढती असते. त्यामध्ये गुलाब, जरबेरा, निशिगंध, केवडा, झेंडू आदी फुलांना मागणी अधिक असते. फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी जागतिक स्तरावर आणखी चांगली संधी देशाला आहे. जागतिक फुलांच्या बाजारपेठेत अवघा ०.०७ ते ०.०९ टक्क्यांपर्यंत वाटा भारताचा आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने बदलेलेल्या धोरणामुळे फुलशेतीत वाढ होत आहे. मात्र, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांच्या आसपासच ही फुलशेती विकसित होत आहे. मोठ्या शहरांनजीक उच्च तंत्रज्ञानयुक्त हरितगृह उभारणीकडे कल आहे. देशाच्या फुलशेतीचा विचार करता आंध्र प्रदेश हे फुलोत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र उत्पादनाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय मार्केटचा विचार केला जर जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादिंच्या सुट्या फुलांना मोठी मागणी असते. देशात फुलशेतीचे सरासरी २ लाख ३३ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. निर्यातीचा विचार करता २२ हजार ४८५ टन फुलांची निर्यात केली जाते. साधारणतः ४५० कोटी रुपयांच्या फुलांची निर्यात केली जाते. गुलाबाला सर्वाधिक मागणी असून देशात दररोज १९९ कोटी नग गुलाबांचे उत्पादन होते.

महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग फुलशेती करतो. ग्रामीण भागात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर खूप उलाढाल होते. एक एकर फुलबागेकरीता साधारण १.५ ते २ लाख रुपये खर्च येतो. सध्या महाराष्ट्र फुल उत्पादनात अग्रेसर राज्य मानले जाते. फुल उत्पादनासाठी आवश्यक असलेली जमीन व हवामान महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. राज्य सरकारनेही फुलांच्या हरितगृहातील व मोकळ्या जागेतील फुल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांमध्ये फुलशेतीचा विस्तार झपाट्याने होत आहे. कारण पारंपरिक व नवीन जातींच्या फुल लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान वाटप, हरितगृह व मोकळ्या जागी फुलशेतीचा विस्तार, फुल उत्पादनाचे वृनवीन प्रकल्प यावर भर दिला जात आहे. सुट्टी फुले, झेंडू, जाईजुई बिजली, मोगरा, शेवंती, ग्लाडिया, अस्तर या सुट्ट्या फुलांच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. फुलशेतीच्या अनुदानासाठी शेतकऱ्याकडील जमिनीचा ७-१२ उतारा, महिला फुल उत्पादक शेतकरी, मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जमातीतील लोक, लहान अल्पभुधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. कट फ्ल़ॉवर्स, बल्बीयस फॉवर्ससाठी अनुदान दिले जात आहे.

 


महाराष्ट्रात प्रामुख्याने गुलाब, झेंडू, निशीगंधा, कार्नेशन, जरबेरा, केवडा, मोगरा, अस्तर या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

गुलाबाची शेती कशी करायची  -  हवामान 

गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येते, तरी पण उत्तम दर्जाची फुले मिळविण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस असावे.

जमीन-

गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन मानवते. हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो, परंतु या जमिनी कसदार नसतात. म्हणून अशा जमिनीमध्ये शेणखतांचा भरपूर वापर करावा. भारी जमिनीतून पाण्याचा निचरा नीट होत नाही परिणामी त्याचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. झाडाची पाने पिवळी पळून पानांवर काळे ठिपके पडतात.

झेंडूची लागवड कशी करायची  -

हवामान – उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात याची वर्षभर लागवड करता येते. फुलांच्या उत्पादनासाठी मध्यम हवामान लागते. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाची वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. थंड हवामानात हे पीक चांगले येते.

आकारानुसार निवडा झेंडुंच्या जाती

आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू आणि संकरित झेंडू हे प्रकार आहेत.

आफ्रिकन झेंडू – यात अनेक उप प्रकार आहेत. झाडांची उंची,वाढीची सवय, फुलांचा रंग, आकार यामध्ये विविधता आढळते. फूल प्रकारानुसार कार्नेशन आणि शेवंती हे प्रकार दिसतात. कार्नेशन प्रकारातील झेंडू हे ७५ सेंमी उंचीपर्यंत वाढतात. त्यांना १० सेंटीमीटर व्यासची फुले लागतात. शेवंती प्रकार – हे फुले शेवंतीसारखी दिसतात. संकरित झेंडू-  उंच संकरित यात झाडे ६० ते ७० सें.मी. उंच असतात. मोठी फुले १२ सें.मी. पेक्षा जास्त व्यासाची असतात. सेमी टॉल  फुले – या जातील झाडे ही  दाट व सारख्या आकाराची ५० सें.मी. उंचीपर्यंत वाढणारी झाडे आढळतात. 

ड्वार्फ मध्यम संकरित  - या प्रकारात दाट वाढणारी, एकाच वेळी फुले देणारी, कमी उंचीची झाडे यात प्रकारात असतात. ही झाडे १४ ते ५०  सें.मी. उंच होत असतात.

आफ्रकिन झेंडूच्या भारतीय जाती

पुसा नारंगी गेंदा  - क्रॉक जॉक आणि गोल्डन ज्युबिली या दोन जातीच्या संकरातून निर्माण झालेली जात आहे. उंची ८० ते ८५ सें.मी. असते. बी पेरल्यापासून १२५ ते १३५ दिवसात फुलावर येते. ४५ ते ६० दिवस फुलावर राहते. फुले नारंगी असतात. याचे उत्पादन २५ ते ३० टन प्रति हेक्टरी असते. या जातीच्या फुलाता  ३२९ मिली पाकळ्या या प्रमाणात कॅरीटीनॉइड असते.

पुसा बसंती गेंदा 

ऑक्टोबर मध्ये बी पेरणी , नोव्हेंबरमध्ये रोपांची पुर्नलागवड होते.फेब्रुवारी- मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. ही जात गोल्डन यलो आणि सन जाइंट या दोन जातींच्या संकरातून तयार झालेली जात आहे. हे जातीचे झाडाची उंचीची ६० ते ६५ सें.मी असते.  या जातीच्या वाढीचा काळ हा १३० दिवसाचा आहे. बी पेरणीपासून १३५ ते १४५ दिवसात ही जात फुलावर येते. ४५ ते ५० दिवस फुलांचा काळ असतो. या जातीचे उत्पादन हे प्रति हेक्टरी २० ते २५ टन असते. 

रोप निर्मिती  - रोपांसाठी २ मीटर बाय २ मीटर आकाराच्या  गादी वाफ्यावर, ओळीत ४ ते ५ सें.मी अंतर ठेवन १ सें.मी. खोलीवर बी विरळ पेरावे. पेरणीनंतर बी शेणखत व माती मिश्रणाने झाकून  टाकावे. वाफ्याला झारीने पाणी द्यावे. हेक्टरी १ ते १.५ किलो बी लागते. संकरित जातीचे बी महाग असते. त्यामुळे त्याची काळजीपूर्वक पेरणी करावी. रोपे तयार करण्यासाठी  प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिट वापरावे. निर्जंतुक केलेले कोकोपिट ट्रेमध्ये भरुन प्रत्येक पेल्यात एक बी टोकून पाणी द्यावे. या पद्धतीने रोपे तयार केली तर २५० ग्रॅम बी पुरेसे होते. तयार केलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी.

लागवड – झेंडुची लागवड शक्यतो सांयकाळी ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपुर्वी रोपांची मुळे ३० मिनिटे कॅप्टन ०.२ टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी.

लागवडीसाठी जमीन नांगरून कुळवून तयार करावी. जमीन तयार करताना प्रति हेक्टरी ४० टन शेणखत मिसळावे. जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार सपाट वाफ्यावर व सरी वरब्यांमध्ये लागवड करतात. बी पेरल्यापासून ३० ते ३५ दिवसांत रोपे पुर्नलागवडीसाठी तयार होतात. निरोगी पाच पानावर आलेली १५ ते २० सेंमी उंचीची रोपे निवडावीत.

 


निशीगंधा – या फुलांच्या पाकळ्यांची संख्या आणि पानांच्या  रंगानुसार सिंगल, डबल, सेमी डबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात. सिंगल प्रकारात फुले रजनी, स्थानिक सिंगल, शुंगार, प्रज्वल या जाती आहेत. तर डबल प्रकारात स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. याचा उपयोग फुलदांड्यासाठी करतात.

कार्नेशन – सिंगल – या प्रकारातील फुले पांढरी शुभ्र असतात. त्यांना अधिक सुगंध असतो. या प्रकारमध्ये सिंगल, शृंगार, प्रज्वल या जाती आहेत.  ही फुले  हार, वेणी, गजरा, माळा, यासाठी वापरली जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले रजनी ही जात विकसित केली आहे.

डबल – या प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव, या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात.  व्हेरिगेटेड – या प्रकारामध्ये सुर्वणरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी  लावण्यासाठी चांगल्या आहेत.

केवडा - केवड्याची नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. याचे कणीस म्हणजे नरफूल २५-५० से.मी. लांब असते. त्यात ५-१० से.मी. लांब अनेक तुरे असतात व त्यावर पांढरट पिवळे सुगंधी आवरण असते, तर मादी फूल लहान असून (५ से. मी.) त्याचे पुढे पिवळे व पिकल्यानंतर लाल रंगाचे लंबगोल १५-२५ से. मी. लांबीचे फळ तयार होते. फुलांचा वापर केवडा अत्तर, केवडा तेल व केवडा पाणी यासाठी करतात. जल ऊर्ध्वपतनाने केवडा तेल व केवडा पाणी मिळते.

मोगऱ्याच्या जाती :

मोतीचा बेला – या जातीतील फुलांची कळी गोलाकार असते. आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.  

बेला  - या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भाषेत गुडूमल्ली म्हणतात. फुलाला दुहेरी पाकळ्या असतात. पण लांब नसतात.

हजरा बेला  - कानडी भाषेत सुजीमल्लीरो म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात. 

मुंग्ना  -तामिळ भाषेत याला अड्डकुमल्ली व कानडीत एलुसूत्ते मल्लरी म्हणतात. काळ्या आकाराने मोठ्या असतात.  फुलात अनेक  गोलाकार पाकळ्या असतात.

शेतकरी मोगरा – या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे याकरिता वापराल जातो.

बट मोगरा  - या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या  चांगल्या टणक फुगतात.

cultivated flower flower farming केवडा Kevada गुलाब rose
English Summary: This is the most cultivated flower in the state, find out the varieties of this flower

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.