1. कृषीपीडिया

अशी होते ह्यूमस आणि ह्यूमिक पदार्थांची निर्मिती

हल्ली ह्यूमिक पदार्थांचा वापर करण्याबाबत कल वाढलेला दिसतो

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अशी होते ह्यूमस आणि ह्यूमिक पदार्थांची निर्मिती

अशी होते ह्यूमस आणि ह्यूमिक पदार्थांची निर्मिती

हल्ली ह्यूमिक पदार्थांचा वापर करण्याबाबत कल वाढलेला दिसतो म्हणूनच त्याची निर्मिती कशी होते ते पहाणे उचित ठरेल.वनस्पतीत कार्बोदके ,सेल्युलोज मेद ,मेण आणि लिग्निन हे घटक असते. जेव्हां सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात तेव्हा विविध जीवजंतू त्यावर तुटून पडतात. साधी कर्बोदके आणि प्रधिनांचा भाग यावर बुरशी हल्ला करतात.सेल्यूलोजवर मिक्सबॅकटेरीचा हल्ला होवून विविध फिनॉल्स तयार होतात. पॉलीफिनॉलची उप्पत्ती लिग्निन पासून किंवा सूक्ष्मजीवाणूंनी तयार

केलेले अशी असते. त्यांचे रुपांतर क्विनाईनस् मध्ये होते जी नत्राबरोबर अभिक्रिया करुन तपकिरी ह्यूमिक पदार्थ तयार करतात. पुष्कळसे जीवाणूं लिग्निचे अपघटन घडवून फिनॉल तयार करतात जे ह्युमसच्या निर्मितीत प्रमुख घटक म्हणून काम करतात. ह्युमिक आणि फुलविक आम्लात अॅमिनो आम्ल असतात नेहमी प्रमाणे तयार केलेली ह्युमिक आम्ल पाण्यात लागलीच विद्राव्य नसतात. पहिल्यांदा त्यांचे क्षारात रुपांतर होते . First they are converted into salt. उदा . सोडीयम ह्यूमेट , पोटॅशियम ह्यूमेट. आणि म्हणूनच ह्यूमिक आम्लांची खरेदी करताना ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी. 

मृदेतील ह्यूमसचे कार्य: ह्यूमस मृदेची जलधारण क्षमता वाढविते. रेताड जमिनीत वाढून कठा एकत्रित बंधनात ढेवण्यास मदत करते. चिकनमाती आणि वालुकयुक्त मातीत सुद्धा मृदेची जडणघडण सुधारते. त्यात आयन शोषण्याची क्षमता जास्त असते. चिकनमातीच्या ४-६ % जादा इतकी ती भरते. उभयांतर वर्तक म्हणूनही ते कार्य करते. वनस्पतीसाठी ते पूर्णान्न आहे. कारण त्यात वाढीस लागणारी सर्व पोषद्रव्ये आहेत. मृदेत ह्यूमस असल्याच तिच्या सामूत अचानक बदल घडत नाही.

भौतिक दृष्ट्या मातीचा रंग पोत घडण जलधारण क्षमता यांच्यात परिवर्तन होवून जलमिस्सारणात , हवेशीरतेत वाढ होते. माती अधिक सच्छिद्र बनते. रासायनिक दृष्ट्या ह्युमस पोषद्रव्यांचे स्त्रोत म्हणून कार्य करते सोबत मृदेची उमय प्रतिरोधक क्षमता वाढवते काही मृदा खनिजांची विद्राव्यता वाढवते ; लोहासारख्या मुलद्रव्याला चिलेशन क्षमता असल्याने ते ताबडतोब उपलब्ध होतात. सर्व सूक्ष्मजीवांचे अन्न म्हणून ह्यूमचे कार्य सर्वांना माहित आहेच. मृदेत युक्त स्थितीत असलेल्या कॅल्शियम कार्बोनेटचे बरेच प्रमाण

असेल तर अपघटन होण्यासारखे सेंद्रिये पदार्थ सुयोग्य पातळीत राखून तसेच मूळांचा श्वसनाचा वेग वाढवून मृदेची पारगग्यता राखऱ्यास ह्युमस मदत करते विघटन होवू शकणाऱ्या सेंद्रिय घटकांपासून कार्बनडाय ऑक्साईड वायू तयार होतो. मृदेतील जड धातू सेंद्रिय घटकांबरोबर अमिक्रिया घडवून आणतात. त्यापासून जटिल संयुगे बनतात. मातीमध्ये धातू द्रावण प्रावरयेत असतात. विद्राव्य स्वरुपातील धातू- सेंद्र संयुगे पोषणदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाची आहे.

English Summary: This is the formation of humus and humic substances Published on: 19 August 2022, 07:11 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters