1. कृषीपीडिया

'हे' लसणाचे वाण देतील भरपूर उत्पादन, जाणून घेऊ लसणाची लागवड पद्धत

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
veriety of garlic crop

veriety of garlic crop

लसून हे मसाल्याच्या श्रेणीतील महत्वाचे पीक मानले जाते. लसणात एलिसिन नावाचे तत्व असते. यामुळे त्याला तिखट चव येते. लसूण मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म देखील असतात जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात.

तसे पाहिले तर लोणची, चटण्या, मसाले आणि भाज्यांमध्ये लसणाचा सर्वाधिक वापर केला जातो. विशेषतः आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये लसणाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते.

भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लसणाचे औषधी आणि सेंद्रिय लागवड केली जाते. जर तुम्हाला ही या पिकापासून जास्त उत्पादन घ्यायचे असेल

तर तुम्हाला तुमच्या शेतातील सुधारित बियाणे,सिंचन व्यवस्था, पोषण आणि तन व्यवस्थापनाची योग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण लसणाच्या प्रगत लागवडीबद्दल जाणून घेऊ.

 लसणाच्या लागवडीसाठी उपयुक्त सुधारित वाण

 आपल्याला माहित आहेच की लसणाची लागवड पाकळ्या च्या माध्यमातून करण्यात येते. लसुन लागवडीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रोग प्रतिरोधक वाणांची निवड करावी.

लसणाच्या लागवडीसाठी सुधारित जातींमध्ये ॲग्री फाउंड व्हाईट, ॲग्री फाउंड पार्वती, ऍग्री फाउंड पार्वती 2, यमुना सफेद, यमुना व्हाईट 2, यमुना व्हाईट तीन, जीजी 4, फुले बसवंत, व्हीएल लसुन दोन, व्हील लसुन एक आणि उटी 1 इत्यादींचा समावेश आहे.

नक्की वाचा:या'5 अत्यावश्यक भारतीय मसाल्यांमध्ये आहे बरेच आजार चुटकीसरशी पळवण्याची ताकत

 लसुन पिकासाठी सिंचन व्यवस्था

 लसूण लागवड केल्यानंतर पिकास 10 ते 15 दिवसांच्या अंतराने योग्य पाणी द्यावे. पावसाळ्यात सिंचनाचे प्रमाण कमी करून फक्त संध्याकाळी पाणी द्यावे.

त्याच वेळी जेव्हा हवामान खूप उष्ण असेल तेव्हा चांगले पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीला ओलावा आणि पिकाला पूर्ण पोषण मिळते.

 खत व्यवस्थापन

लसूण लागवडीतून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा.1 हेक्टर क्षेत्रामध्ये लसुन लागवड  अगोदर दहा ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे.

याशिवाय नत्र 100 किलो, स्फुरद 50 किलो,पालाश यांचाही पिकामध्ये वापर करावा. लागवडीनंतर  25 ते 30 दिवसांनी आणि 40 ते 45 दिवसांनी लसुन पिकास उरलेले नत्र द्यावे.

नक्की वाचा:Millet Farming: खरीप हंगामात 'या' पद्धतीने करा बाजरीची पेरणी; उत्पादन वाढणार

तण व्यवस्थापन

लसणाचे पीक तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.लसूण लागवडीनंतर सात ते आठ दिवसात पिकांमध्ये तणाचे उगवन सुरू होते.

परंतु लक्षात ठेवा की पेरणी बरोबरच कधी कधी अनावश्यक तण देखील येऊ लागते. त्यासाठी लवकरात लवकर शेतातील तण निंदणी करून वेळेवर काढणे गरजेचे असते. तसेच रोग आणि किडींपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करू शकतात.

नक्की वाचा:माहितीस्तव!फुलशेतीत 'या' फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, जाणून घ्या त्याची माहिती

English Summary: this is species of garlic give more production and income Published on: 22 June 2022, 06:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters