सध्या हवामान बदलामुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक नवनवीन रोग पिकांवर होताना दिसत आहेत.
याबाबतीत शास्त्रज्ञ देखील म्हणतात की या बदलामुळे शेतीवरही अनेक रोगांचा परिणाम भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता असून यामध्ये हरभरा पिकावर अनेक रोग निर्माण होऊ शकतात असे आढळून आले आहे. आता आपण हरभरा पीक लागवडीचा विचार केला तर रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. परंतु रब्बी हंगामातील या महत्त्वाच्या पिकावर सध्या एक नवीनच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. जर आपण मागील काही वर्षांचा विचार केला तर मध्ये शास्त्रज्ञांना कोरडवाहू कूज नावाचा नवीनच रोग हरभऱ्यावर शास्त्रज्ञांना आढळून आला आहे.
हा रोग येण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते तापमान, बहुतांशी दुष्काळी परिस्थिती आणि जमिनीत पुरेसा ओलावा नसणे ही कारणे प्रामुख्याने यामागे आहेत.
जेव्हा हरभरा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा झाडाचे मूळ व खोडाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुळकुज आल्यामुळे हरभरा चे रोप कमकुवत होते तसेच पाने हिरवी पडतात, झाडाची वाढ खुंटते आणि खोड नष्ट होते. झाडांची पाने कोमेजून वाळतात.
या रोगाबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात?
इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरीड ट्रॉपिक्स चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ममता शर्मा यांनी हरभरा पिकामध्ये या रोगाच्या वाढीमागे कोणती कारणे आहेत याचा अभ्यास करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. याविषयी त्यांनी सांगितले की हवामानातील बदलामुळे तापमानात वाढ होत आहे आणि जमिनीतील ओलावा कमी होत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे वेगवेगळे आजार पिकांवर येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यावर संशोधन सुरू केले आहे. या संशोधनात एक नवीन रोग आढळला तो म्हणजे कोरड्या मुळाचा सड हा होय. जो तापमानामध्ये बदल होत असताना मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे.
हरभऱ्याच्या रुट रॉट रोग मॅक्रोफोमिना फेसोलीना नावाच्या रोग जनका मुळे होतो. हा जिवाणू जमिनीत वाहून नेणारा आहे. याविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की पिकावर फुले व फळे येण्याच्या कालावधीमध्ये जर तापमान वाढले आणि जमिनीतील ओल कमी झाली तर या रोगामुळे हरभऱ्याचे खूप नुकसान होऊ शकते. या बाबतीत त्यांनी पुढे सांगितले की आम्ही राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली ज्या ठिकाणी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली होती तेव्हा आम्हाला कळले की हा रोग बऱ्याच ठिकाणी पसरत आहे. त्यानंतर आम्ही त्याची चाचणी केली कि याला किती तापमान आवश्यक आहे? जमिनीत ओलावा किती कमी आहे मग त्याचा परिणाम जास्त होईल. राज्यातील एकूण पिकांपैकी पाच ते पस्तीस टक्के पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. शास्त्रज्ञांच्या निरीक्षणावरून त्यांना दिसून आले की जेव्हा तापमान 30 अंश पेक्षा जास्त असते आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा कमी असते तेव्हा हा रोग अधिक वाढतो.
आता शास्त्रज्ञ या संशोधनावरून केलेला अभ्यासाचा उपयोग या रोगाचा प्रतिकार कशा स्वरूपात करता येईल आणि हरभऱ्याचे उत्तम व्यवस्थापन धोरण विकसित करण्यासाठी कशा स्वरूपात करता येईल याचा शोध घेत आहेत. जर शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर ते हरभरा पीक वाचवू शकतात. यामध्ये जसे की शेतात तणाचा प्रादुर्भाव होऊ न देणे सोबतच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असेल तर सिंचनाचा उपयोग केला तर काही नुकसान टाळता येईल. संसर्गापासून वाचवण्यासाठीशास्त्रज्ञांची एक टीम कार्यरत आहे. (संदर्भ शेती शिवार)
Share your comments