1. कृषीपीडिया

Crop Tips: शेतकरी बंधूंनो! ज्वारीचे 'हे'वाण देईल पशुसाठी पौष्टिक हिरवा आणि वाळलेला चारा, वाचा डिटेल्स

रब्बी हंगामामध्ये ज्वारी लागवड केली जाते. रब्बी हंगामातच नाहीतर खरीप हंगामामध्ये देखील ज्वारीची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. जर आपण पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला तर जनावरांच्या चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी मका, ज्वारी, बाजरी तसेच नेपियर, मारवेल सारखी संकरित चारा-पिके मोठ्या प्रमाणात लावतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jwaar veriety for animal grass

jwaar veriety for animal grass

रब्बी हंगामामध्ये ज्वारी लागवड केली जाते. रब्बी हंगामातच नाहीतर खरीप हंगामामध्ये देखील ज्वारीची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. जर आपण पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला तर जनावरांच्या चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी मका, ज्वारी, बाजरी तसेच नेपियर, मारवेल सारखी संकरित चारा-पिके मोठ्या प्रमाणात लावतात.

या पार्श्वभूमीवर फक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी विकसित केलेले ज्वारीचे सीएसव्ही 40 एफ हे वाण हिरव्या आणि वाळलेल्या कडब्याच्या गरजेसाठी विकसित करण्यात आले असून या पासून बनणारा कडब्याचे गुणवत्ता व सकसपणा अधिक असतो.

नक्की वाचा:Vegetable Tips: 'या'सुधारित जातींची लागवड देईल दोडका उत्पादन भरघोस, मिळेल भरपूर नफा

 सीएसव्ही 40 वाणाची वैशिष्ट्ये

1- आपण  प्रामुख्याने विचार केला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांची गरज ही चारापिकांची असते. ही गरज लक्षात घेऊन परभणी येथील ज्वारी संशोधन केंद्राने सीएसव्ही 40 एफ हे वाण विकसित केले आहे.

2- या वाणापासून हिरवा चारा हेक्‍टरी 40 ते 46 टन मिळतो. तसेच वाळलेला चारा हेक्टरी 14 ते 15 टनांपर्यंत मिळतो.

3- त्याची कडब्याची प्रत उत्तम असून यामध्ये 54.48 टक्के प्रथिने,7.7 टक्के व उंच वाढणारा तसेच हिरवा गार,लांबरुंद पाने,मध्यम गोड रसाळ धांडा व खोडमाशी तसेच खोड किडा व पानावरील ठिपके यास मध्यम सहनशील वाण आहे.

नक्की वाचा:Important: दुग्ध व्यवसायात अधिक फॅट आणि अधिक दूध उत्पादन हवे असेल तर पाळा 'या' जातीची म्हैस

पेरणी केव्हा करावी?

 आपण खरीप ज्वारीची लागवड करतो अगदी त्याचप्रमाणे या वाणाची लागवड जूनच्या दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव यामध्ये वाढतो असे आढळून आले आहे.

 पेरणीचे अंतर किती ठेवावे?

 पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 25 सेंटिमीटर व दोन ताटातील अंतर दहा सेंटिमीटर  राहील अशा पद्धतीने तिफणीच्याच्या साह्याने पेरणी करणे गरजेचे आहे. तासातील व ताटातील अंतर कमी ठेवले तर धांडे बारीक होतात व जनावरांना खाण्यास व पचनास फायदेशीर ठरते.

 खत व्यवस्थापन कसे करावे?

हे पीक नत्र व स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांचा सकारात्मक प्रतिसाद देणारे आहे त्यामुळे वाढीच्या अवस्थेत योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांचा वापर केल्यास हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात वाढ होते.

जर आपण प्रति हेक्‍टरी विचार केला तर100 किलो नत्र,50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश यांचा पुरवठा करावा. 100 किलो नत्रापैकी 50 किलो हेक्टरी नत्राची मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेली अर्धी मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणी केल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी द्यावी.

नक्की वाचा:Animal Care: मिल्क रिप्लेसर म्हणजे काय? पशुपालनात कसा होतो त्याचा उपयोग? वाचा डिटेल्स

English Summary: this is jwaar crop veriety is so benificial for animal grass Published on: 01 October 2022, 12:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters