पिकापासून भरघोस उत्पादन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. तसे पाहायला गेले तर खते पेरून किंवा फोकून दिले जाते. हे दाणेदार खतांच्या बाबतीत ठरू शकते.परंतु पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा हा विद्राव्य खतांच्या माध्यमातून केला जातो. विद्राव्य खते ही पाण्यात विरघळणारी असल्यामुळे ठिबकच्या माध्यमातून खताचा पुरवठा पिकांना केला जातो.
परंतु विद्राव्य खतांचा वापर करताना काही गोष्टींची तंतोतंत काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम आणि पिकांना होणारी पोषक घटकांची उपलब्धता व्यवस्थित होते. या दृष्टिकोनातून विद्राव्य खते देताना प्रामुख्याने कोणती काळजी घ्यावी? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
नक्की वाचा:Floriculture: फुल शेती करायचा प्लान असेल तर करा 'या' फुलाची लागवड, कमवाल बंपर नफा
विद्राव्य खते देताना 'ही' काळजी घ्या
1- सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण विद्राव्य खते पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा ती एकसारख्या प्रमाणात मिळणे गरजेचे आहे. तेव्हाच ते सारख्या प्रमाणात पिकाला देणे शक्य आहे. विद्राव्य खते पाण्यात विरघळून त्यांचा गाळ किंवा साका तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी.
2- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मिश्रण पाण्यामध्ये टाकावे. त्याउलट विद्राव्य खतांच्या मिश्रणात पाणी टाकू नये.
3- तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते देण्याच्या अगोदर ठिबक संचाचा जाळीचा फिल्टर, मेन लाईन तसेच लॅटरल,फ्लश वोल्व, सॅण्ड फिल्टर इत्यादींमधून गळती तर होत नाही ना याची दक्षता घ्यावी.
4- तसेच ठिबक चालू केल्यानंतर शेतातील सर्व ड्रीपरच्या ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी येते की नाही हे देखील बघणे गरजेचे आहे. काही ड्रीपर मधून व्यवस्थित पाणी येत नसेल तर त्यामध्ये असलेल्या चकत्या टाकून व्यवस्थित फिट करून घ्याव्यात.
5- तसेच ठिबक संचाचे सॅण्ड फिल्टर व जाळीचे फिल्टर व्यवस्थित नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासोबतच लॅटरलची तोंडे आठ ते पंधरा दिवसांनी उघडून पाण्याचा दाब देऊन स्वच्छ करून घ्यावी.
6- विद्राव्य खते देणे अगोदर झाडांना पाण्याची किती गरज आहे हे त्या भागातील जमीन तसेच हवामान व पिकाची अवस्था इत्यादी गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून निश्चित करावी. पाणी देताना जमिनीत दररोज वाफसा स्थितीत राहील या बेताने पाणी देणे गरजेचे आहे. जमीन जर वाफसा स्थितीत राहिली तरच पाणी किंवा इतर अन्नद्रव्ये पिकाला चांगल्या रीतीने अपटेक करता येतात.
7- ठिबकमधून खते द्यायची असल्यास दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये. कारण पाण्याबरोबर खतांचा निचरा होतो म्हणून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी द्यावे.
8-19:19:19 आणि 12:61:00 कधी एक किलो खते विरघळण्यासाठी कमीत कमी 15 लिटर पाण्याची आवश्यकता असते व एक किलो 00:00:50 विरघळण्यासाठी 20 लिटर पाणी वापरणे गरजेचे आहे.
9- कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम आणि बोरॉन मिश्रखत ही ड्रीप खते 13.00:45 या खतांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या खताबरोबर मिसळू नये.
10- ह्युमिक ऍसिड व सी विड पावडर सारखी इतर पावडरयुक्त खते असतील तर ते पाण्यामध्ये मिसळताना ड्रममधील पाणी अगोदर गोलाकार चांगले ढवळून घ्यावे व त्यामध्ये हळूहळू ही पावडर पाण्यात टाकावे.
11- समजा तुम्हाला ह्युमिक ऍसिड विरघळवायचे असेल तर पाण्याचे प्रमाण शंभर लिटर प्रति किलो साठी वापरावे. तसेच चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्या वापरानंतर त्यांचे पॅकेट सीलबंद करून ठेवावे.
12- त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे कॅल्शियम, सल्फर व कॉपर युक्त खते कोणत्याही खताबरोबर मिसळू नयेत.
13- त्यासोबतच फॉस्फरिक ऍसिड सोबत कोणतीही फवारणी किंवा ड्रीप खत एकत्र करू नये.
14- नत्रयुक्त खते वातावरणातील आद्र्रता शोषून घेतात त्यामुळे ही खते उघडे ठेवल्यास व ओलावा धरतात. त्यामुळे ती खते उघडे ठेवू नयेत.
नक्की वाचा:तुम्ही ई-पीक पाहणी केली, परंतु ती यशस्वी झाली का? जाणून घ्या सविस्तर
Share your comments