1. कृषीपीडिया

तुम्ही ई-पीक पाहणी केली, परंतु ती यशस्वी झाली का? जाणून घ्या सविस्तर

ई-पीक पाहणी आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही प्रकारच्या नुकसान

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुम्ही ई-पीक पाहणी केली, परंतु ती यशस्वी झाली का? जाणून घ्या सविस्तर

तुम्ही ई-पीक पाहणी केली, परंतु ती यशस्वी झाली का? जाणून घ्या सविस्तर

ई-पीक पाहणी आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही प्रकारच्या नुकसान किंवा शेती संबंधित लाभासाठी ई- पीक पाहणी गरजेचे आहे. मागच्या वर्षी ई- पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर प्रकारचे अडथळे आले होते.बऱ्याच शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी एप्लीकेशन वापरता येत नव्हते. या अनुषंगाने शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी व्हर्जन 2 नवीन ॲप्लिकेशन आणले.त्यामुळे बरेच शेतकरी बांधवांना या वर्षी ई-पीक पाहणी करणे सुलभ झाले. परंतु यामध्ये सगळ्यात

महत्त्वाची बाब म्हणजे जरी आपण ई-पीक पाहणी केली,The important thing is that even if we do an e-peak inspection, परंतु ती यशस्वीरित्या अपलोड झाली आहे की नाही हे समजणे देखील महत्त्वाचे आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले

कारण ही पाहणी केल्यानंतर आपल्या पिकांची नोंद सातबारा उतारा वरती होते. त्यासाठी ई-पीक पाहणी यशस्वी झाली की नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण या संबंधीची महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत.अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून तपासात तुमच्या ई-पीक पाहणीची स्टेटस तुम्ही केलेली ई-पीक पाहणी यशस्वीरित्या अपलोड

झाली आहे की नाही हे तुम्ही ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तपासू शकतात.या माध्यमातून तुम्ही स्वतःची ई-पीक पाहणी झाली आहे की नाही किंवा गावातील कोणकोणत्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झालेली आहे हे देखील तपासू शकतात. त्यासाठी तुम्हाला 1- सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअर डाऊनलोड करायचे आहे.2- हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ई-पीक पाहणी अँप उघडून त्यामध्ये महसूल विभाग निवडायचा आहे.

3- महसूल विभाग निवडल्यानंतर तुम्ही ई-पीक पाहणी केली असल्यामुळे ‘खातेदार निवड’ हा पर्याय तुमच्या समोर येईल.4- त्यानंतर तुम्ही तुमच्या शेताचा खाते क्रमांक व तुमचा सांकेतांक क्रमांक देखील टाकायचा आहे.5- त्यानंतर गावाचे खातेदारांची पीक पाणी हा विकल्प निवडायचा आहे. तुम्ही जेव्हा हे ॲप उघडाल त्यानंतर शेवटी गावाचे खातेदारांची पीक पाहणी हा पर्याय आहे. या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव हिरव्या रंगात असेल.6- या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांचे नाव दिसतील. ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर हिरवा रंगाचे

निशाण आहे, तर समजावे त्या शेतकऱ्यांची संपूर्ण ई-पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.7- त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक डोळा दिसतो. या डोळ्याच्या समोर असलेल्या चिन्हावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या शेतात कोणते पीक आहे व कोणत्या तारखेला तुम्ही पीक पाहणी केलेली आहे हे संपूर्ण दिसते. या ठिकाणी तुम्हाला लागवड क्षेत्र तसेच खाते क्रमांक व सर्व गटातील केलेली पीक पाहणी या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी मिनिटात तुमच्या मोबाईलवरून ई-पिक पाहणी झाली की नाही हे तपासू शकतात.

English Summary: Did you do the E-Peak inspection, but was it successful? Know in detail Published on: 23 October 2022, 05:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters