आपल्या जीवनात टोमॅटोचे महत्त्व किती आहे हे तुम्हाला माहीतच आहे. भाजीत टोमॅटो घातल्यानंतर वेगळीच चव तयार होते, यासोबतच टोमॅटो देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
टोमॅटोमध्ये रसायन मिसळतात ज्याचा आपल्या आरोग्यावर भयानक परिणाम:
भाज्यांबरोबरच टोमॅटोचा वापर सॅलड म्हणूनही केला जातो.बहुतेक लोक टोमॅटोमध्ये रसायन मिसळतात ज्याचा आपल्या आरोग्यावर भयानक परिणाम होतो. मात्र यामध्ये आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरात टोमॅटो सहज वाढवू शकता आणि ते स्वतः तर वापरू शकताच पण या व्यतिरिक्त तुम्ही ते बाजारात नेहून विकुही शकता. आज आम्ही तुम्हाला एक सोप्या पद्धतीचा उपाय सुद्धा सांगणार आहोत.
जाणून घ्या प्रक्रिया:-
१. प्लॅस्टिकच्या बाटलीत टोमॅटोचे रोप वाढवायचे असेल तर आधी घरात पडून असलेली प्लास्टिकची बाटली घ्या आणि तिचा खालचा भाग कापून काढा. आता बाटलीला दोऱ्यात लटकवण्यासाठी दोन होल पाडा आणि त्या होलमध्ये दोरा टाकून गाठी बनवा.
२. टोमॅटोच्या रोपांसाठी माती घरी तयार केली जाऊ शकते यासाठी तुम्हाला 50% शेणखत आणि 50% बागेची माती घ्या व ते चांगल्या प्रकारे मिसळा. आता ही माती वरच्या बाजूला १ इंच अंतर ठेवून बाटलीत भरा.
३. बाटलीत टोमॅटोची रोपे लावण्यासाठी किमान 20 ते 25 दिवसांचे रोप घेऊन त्याखालील पाने काढून टाकावीत. आता एक कापड घ्या आणि त्याच्या मध्यभागी एक होल पाडा. हे कापड बाजूने कापा आणि कापलेले कापड रोपाच्या मुळावर चांगले लावावे. त्यानंतर, रोपाला खालच्या बाजूने प्लास्टिकच्या बाटलीत ठेवा.
४. रोपे लावल्यानंतर आणि पाणी दिल्यानंतर, त्यांना 2 ते 3 दिवस थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. त्यानंतर तुम्ही ते सूर्यप्रकाशात ठेवू शकता.
५. हे लक्षात ठेवा की ज्यावेळी माती कोरडी होईल तेव्हाच झाडांना पाणी द्यावे. तसेच दर 10 ते 12 दिवसांनी शेणखत घाला.
अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे टोमॅटो जे झाड लावू शकता आणि आपल्या आरोग्याला रासायनिक टोमॅटो पासून वाचवू शकता.
Share your comments