कांदा हे पीक खूप महत्त्वपूर्ण असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. जर आपण एकंदरीत कांद्याच्या एकूण व्यवस्थापनाचा विचार केला तर यामध्ये पाणी व्यवस्थापन, लागवडीचा योग्य कालावधी आणि खतांचे व्यवस्थापन योग्य असेल आणि वेळेत असेल तर नक्कीच कांदा पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. परंतु बऱ्याचदा काही बाबींमुळे व्यवस्थापनातल्या महत्त्वाच्या बाबी या वेळेवर न झाल्यामुळे त्याचा फटका सरळ उत्पादनाला बसू शकतो.
त्यामुळे प्रत्येकच शेतकरी बांधवांची वेळेत सगळ्या महत्वाच्या बाबी करण्याचा प्रयत्न असतोच. जर आपण कांदा पिकाचा विचार केला तर खत व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असून ते देखील अगदी वेळेत होणे गरजेचे आहे.
शेतकरी बंधू वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर प्रत्येक पिकासाठी करतात व याला कांदा पीक देखील अपवाद नाही. परंतु काही विशिष्ट खताचा पुरवठा योग्य काळात म्हणजेच कालावधीत जर शेतकरी बंधूंनी केला तर कांदा पिकाला नक्कीच याचा फायदा होतो.
म्हणून या लेखामध्ये आपण कांदा पिकाची लागवड केल्यानंतर कोणत्या खताचा पुरवठा किती दिवसानंतर करावा याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
कांदा पिकाचे योग्य कालावधीतील महत्त्वाचे खत व्यवस्थापन
जर आपण कांदा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा मताचा विचार केला तर त्यांच्या मतानुसार कांदा लागवड झाल्यानंतर 30 दिवसांनी कांदा पिकाला 10:26:26 या खताचा पुरवठा करणे गरजेचे असून हे खत 60 किलो तसेच त्यासोबत मॅग्नेशिअम सल्फेट पाच किलो एकत्र करून जमिनीतून कांदा पिकाला देणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:तुमच्या शेतातील कांदा पात पिवळी पडणे, कांदा सडणे असे होत आहे? तर मग करा हे उपाय
आपल्याला माहित आहेच की, लागवड केल्यानंतर कांदा पीक वाढीच्या अवस्थेत असते व 30 दिवसानंतर या वाढीच्या अवस्थेमध्ये जर या खताचा वापर केला तर कांदा पिकाला स्फुरद या प्रमुख पोषक घटकांची पूर्तता होते व पिकाच्या जोमदार वाढीसाठी मदत होते.
तसेच 30 दिवसानंतर या खताचा वापर केला तर कांदा पिकाच्या मुळांची वाढ जलद होते व मुळाचा विकास होतो. तसेच कांदा पिकामध्ये अन्नद्रव्यांची पोषण क्षमता देखील सुधारते. याबद्दल आपण काही शेतकऱ्यांच्या मताचा विचार केला तर
त्यांच्यामध्ये लागवडीच्या 30 दिवसानंतर 10:26:26 या खताचा वापर केला तर कांद्याचे उत्पादन जेव्हा मिळते तेव्हा एक सारख्या आकाराचे कांदे आहे आपल्याला मिळतात. तसेच कांदा उत्पादनामध्ये 12 टक्क्यांपर्यंत वाढ देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी कोणत्याही खताचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा
Share your comments