भाजीपाला लागवड म्हटली म्हणजे दररोज पैसा हातात खेळता राहतो. महाराष्ट्रात बहुतांशी शेतकरी भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर प्रामुख्याने मिरची,भेंडी, वांगे आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये जास्त करून कारले,काकडी आणि दोडके आणि कमी कालावधीत येणाऱ्या कोथिंबीर आणि मेथीची देखील लागवड बऱ्याच प्रमाणात होते.
नक्की वाचा:वांग्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरा प्रकाशसापळे, वाचा आणि विचार करा
कुठलाही पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी त्या पिकाची सुधारित जातींची लागवड केली तरच मिळणारे उत्पादन चांगले येते. तीच बाब दोडका या वेलवर्गीय भाजीपाला पिकासाठी देखील लागू होते. जर तुमचा देखील दोडका लागवड करायचा प्लान असेल तर तुम्ही या सुधारित जातींची लागवड करून भरपूर उत्पादन मिळवू शकतात.
दोडक्याच्या सुधारित जाती
1- पुसा स्नेहा- जर आपण दोडक्याच्या या जातीचा विचार केला तर या जातीपासून मिळणाऱ्या दोडक्याची लांबी 20 ते 25 सेंटिमीटर असते व रंग गडद हिरवा असतो. अवघ्या 50 ते 55 दिवसांनी हे पीक पक्व होते व काढणीस तयार होते. जर आपण हेक्टरी उत्पादनाचा विचार केला तर 200 ते 230 क्विंटल उत्पादन मिळते.
2- पुसा नसदार- या जातीच्या फळांचा रंग हिरवा असतो व आतील गर पांढरा आणि हिरवा असतो. फळाची लांबी 12 ते 20 सेंटिमीटरच्या आसपास असते.हेक्टरी उत्पादनक्षमता दीडशे ते 160 क्विंटल असते.
नक्की वाचा:यावर्षी तूर या पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल? वाचा आणि फक्त हे काम करा
3- कल्याणपुर ग्रीन स्मूदी- या जातीचे दोडके आकाराने मध्यम असते.यावर हलके पट्टे असतात व प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता 350 ते 400 क्विंटल इतकी जास्त आहे.
4- स्वर्णप्रभा- हि थोड्या जास्त कालावधीची जात असून उत्पादन चांगले आहे. या जातीला पक्व होण्यासाठी 70 ते 75 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु या पासून मिळणारे उत्पादन हेक्टरी 200 ते 250 क्विंटल इतके आहे.
5- काशी दिव्या- या जातीची फळे दंडगोलाकार असतात व रंग हलका हिरवा असतात व लांबी 20 ते 25 सेंटिमीटर असते. या जातीचे दोडके काढणीला लवकर तयार होते. म्हणजेच 50 दिवसांपर्यंत आहे हे पीक काढणीस येते. याची उत्पादनक्षमता प्रति हेक्टर 130 ते 160 क्विंटल इतके आहे.
नक्की वाचा:Fertilizer Tips: उसापासून हवे भरपूर उत्पादन तर 'सिलिकॉन' आहे गरजेचे, वाचा याचे फायदे
Share your comments