1. कृषीपीडिया

हे आहे खरे पोटॅशियमचे महत्त्व

पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास त्याचे अनेक अनपेक्षित परिणाम वेलीवर होत असतात. त्यामुळे पानांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हे आहे खरे पोटॅशियमचे महत्त्व

हे आहे खरे पोटॅशियमचे महत्त्व

पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास त्याचे अनेक अनपेक्षित परिणाम वेलीवर होत असतात. त्यामुळे पानांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जास्त पोटॅशियमचे अनेक दुष्परिणाम द्राक्षावर होत असतात. कारण पोटॅशचे "झायलम' आणि "फ्लोएम' या उतींमधून वहन होते, तर कॅल्शियमचे वहन फक्त झायलम उतीमधून होते. 

पोटॅशचे वहन व साठा सतत सुरू असतो तर कॅल्शियमचा साठा साखर भरताना थांबतो. पोटॅशियमचे प्रमाण वाढले तर अन्नघटकांचे वहन वाढते. अन्नपुरवठा करणाऱ्या पानांना पोटॅशियम पुरवले तर अन्नघटकांच्या वहनावर त्वरित परिणाम होतो. हे जरी खरे असले तरी पोटॅशियम या अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही एवढे 

म्हणजेच कमतरता पातळी पेक्षा थोडे जास्त प्रमाण राहील, एवढा पोटॅश पानांमधून पुरविणे त्वरित उपयोगाचे असते, परंतु जमिनीतून होणारा पुरवठाही थोडा उशिरा पण बराच उपयोगी असतो. आपल्याकडील बहुतांश बागांतील जमिनींमध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त असते. त्यात प्रमाणापेक्षा जास्त पोटॅश पुरविला तर त्याचे प्रमाण वाढून वेगळा फायदा होत नाहीच, पण तोटा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कारण धन (+) भारीत कॅटायन पैकी पोटॅशियमचे प्रमाण पक्व द्राक्षात जास्त असते. गरापेक्षा सालीत ते तीन पटींनी जास्त असते. त्यामुळे द्राक्षरसातील मुक्त आम्ले कमी होतात आणि त्याचा सामू वाढतो. त्यामुळे मद्यनिर्मितीतीत मॅलोलॅक्‍टीक फरमेंटेशन वाढते आणि दर्जा बिघडतो. 

पोटॅशचा वापर अनियंत्रित असला तर द्राक्ष सालीत पोटॅशचे प्रमाण वाढून बिनरंगाच्या द्राक्षात रंगीत घटक तयार होऊन पिंक बेरीज दिसू लागतात. पोटॅशयुक्त खतांचा वापर वाढल्यावर जसे द्राक्षमण्यांमध्ये पोटॅशचे प्रमाण वाढते, त्याचप्रमाणे जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढले तरीही पोटॅशचे प्रमाणात वाढ होते. यामुळे पोटॅशियमच्या प्रमाणावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम यांचे परिणामही अवलंबून असतात. अधिक प्रमाणातील लोहाचेही दुष्परिणाम द्राक्षावर होतात. पानांमधील हरित द्रव्य कमी होते. पानांवर पिवळसर तसेच करपलेले चट्टे दिसतात. उच्चप्रतीच्या दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन हे सर्वस्वी त्याच्या पोषणावर अवलंबून आहे.

द्राक्षमणी हा जैविक रासायनिक कारखाना आहे. यात तयार होणारे उत्पादन हे केवळ एका घटकावर अवलंबून नसते याची कल्पना खालील रचनेवरून येईल.

जमीन हवामान मशागत व्यवस्थापन 

भौतिक, रासायनिक, जैविक 

पाऊस तापमान आर्द्रता प्रकाश वारा 

रूटस्टॉक, सायन वळण, छाटणी अंतर मशागत 

पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके, विस्तार, रोग- कीड

वेलीचे शरीरशास्त्र फळाची घडण ,फळाचा दर्जा

यावरून असे लक्षात येते की, पोषण हा अनेक घटकांपैकी एक घटक असला तरी सर्व घटकांचा परिणाम दर्जेदार द्राक्ष हा आहे, प्रत्येक घटकाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. द्राक्षपोषणाकडे या दृष्टिकोनातून बघितले तर संतुलित पोषण कसे असावे हे लक्षात येईल.

English Summary: This is a real information of potassium Published on: 16 February 2022, 02:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters