1. कृषीपीडिया

चिंता कसली! कीड व रोगांना न घाबरता लावा वांगी आणि कमवा चांगला नफा, करा अशा पद्धतीने व्यवस्थापन

वांगी हे असे भाजीपाला पीक आहे त्याची लागवड वर्षभर सर्व हंगामांमध्ये केली जाते. कोरडवाहू शेतीत देखील आणि मिश्र पीक म्हणून देखील वांग्याची लागवड फायदेशीर ठरते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
his insect and disease is very harmful in brinjaal crop

his insect and disease is very harmful in brinjaal crop

वांगी हे असे भाजीपाला पीक आहे त्याची लागवड वर्षभर सर्व हंगामांमध्ये केली जाते. कोरडवाहू शेतीत देखील आणि मिश्र पीक म्हणून देखील वांग्याची लागवड फायदेशीर ठरते.

आपल्याला माहित आहेच कि आहारा मध्ये वांग्याचे उपयोग भाजी, भरीत तसेच आणिअन्य प्रकारे केला जातो. पांढऱ्या वांग्याचा  उपयोग हा मधुमेही असलेल्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. तसेच वांग्यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे व खनिजे देखीलअसतात.या पिकाच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.परंतु वांग्यावरकाही कीड आणि रोग आहेत ते या पिकाला खूपच घातक असूनशेतकऱ्यांसाठी देखील नुकसानदायक आहेत. परंतु यांना घाबरून न जाता त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर वांगेपिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते.या लेखात आपण वांग्यावरील काही रोग व कीड यांची माहिती आणि व्यवस्थापन पाहणार आहोत.

नक्की वाचा:आता शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अल्पदरात भोजन; अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

 वांग्यावरील नुकसानदायक रोग

1- पर्णगुच्छ किंवा बोकड्या- वांग्यावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यासझाडाच्या पानांची वाढ खुंटते. व ती लहान आणि बोकडल्यासारखे दिसतात. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने तुडतुडे या किड्यामार्फत होतो.

  उपाय

1- बियाण्याची लागवड करताना दोन ओळींमध्ये फोरेट हे दाणेदार औषध प्रति वाफ्यास25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

2- रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी मोनोक्रोटोफास 36 डब्ल्यू एस सी 15 मिली व अँकरामायसिन पाच ग्रॅम व दहा लिटर पाणी या मिश्रणामध्ये साधारण पाच मिनिटे बुडवून लावावेत.

3-लागवड केल्यानंतर दहा दिवसांनी फोरेट प्रति हेक्‍टरी दहा किलो या प्रमाणात प्रत्येक झाडास गोल रिंग काढून द्यावे.

4- लागवडीच्या 45 दिवसांनी 12 मिली मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू एससी किंवा 30 ग्रॅम 50 टक्के कार्बारील दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या कराव्यात.

         मर रोग

हा एक बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वांग्याच्या झाडाची पाने पिवळी पडतात. त्यानंतर शिरेमधील पानांवर खाकी रंगाचा डाग दिसतात. झाडाचे खोड मधल्या बाजूने कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात व झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.

    उपाय

 यासाठी या रोगाला बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करणे फायद्याचे ठरते. तसेच पिकांची फेरपालट करावी व नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला तीन ग्रॅम प्रति किलो थायरम चोळावे.

 वांगी पिकावरील नुकसानदायक कीड

         शेंडा आणि फळ पोखरणारी आळी

या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास वांगा पिकाचे नुकसान होते. चिकट पांढऱ्या रंगाच्या या आळ्या शेंड्यातून खोडात शिरतात आणि आतील भाग पोखरतात.आतील भाग अळींनी खाल्ल्यामुळे झाडाची वाढ खुंटते. जेव्हा फळे लहान आकाराचे असतात तेव्हा अळी देठा जवळून फळात शिरुन फळाचे नुकसान करते.

    उपाय

कीड लागलेले शेंडे आळी सकट नष्ट करणे महत्त्वाचे आहे. 40 ग्रॅम कार्बारिल किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास किंवा 2.4 मिली सायपरमेथ्रीन, 25% 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे किंवा दहा टक्के कार्बारिल भुकटी हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात धूरळावी.

नक्की वाचा:ऊस तुटला आता खोडवा ठेवायचा आहे! तर खोडवा उसापासून अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर वापरा या टिप्स मिळेल अधिक उत्पादन

 तुडतुडे कीड

 ही कीड  हिरवट रंगाची असून पानातील रस शोषते. रस शोषले गेल्यामुळे पाने आकसतात तसेस याकीड मार्फत बोकड्या या विशाणु रोगाचा प्रसार होतो.

उपाय

 रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर दोन आठवड्यांनी 12 मिली एन्डोसल्फान 35 टक्‍के प्रवाही किंवा 20 मिली मिलाथिओन 50 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

      मावा कीड

 या किडीचा चा आकार अतिशय लहान असतो तसेच ही कीड पानांच्या पेशीमध्ये सोंड खुपसून पानातील रस शोषते.

     उपाय

20 मिली मॅलॅथिऑन 50 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

English Summary: this insect and disease is very harmful in brinjaal crop Published on: 23 April 2022, 04:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters