1. बातम्या

आता शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अल्पदरात भोजन; अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे जिल्हयातील जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अल्पदरात भोजन व्यवस्था सुरु केली आहे. हा उपक्रम उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. यावेळी जुन्नर बाजार समितीचा शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरउद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.

farmers have a cheap meal at the market committee

farmers have a cheap meal at the market committee

केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करत आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकारकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे जिल्हयातील जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अल्पदरात भोजन व्यवस्था सुरु केली आहे. हा उपक्रम उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. यावेळी जुन्नर बाजार समितीचा शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरउद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.

तसेच अशाप्रकारे जिल्ह्यातील इतर सात बाजार समितीत हा उपक्रम सुरू करता येईल का या बाबत माहिती घेऊ असेही ते म्हणाले. जुन्नर बाजार समितीने नारायणगाव येथे सुरु केलेला उपबाजार खूपच प्रसिद्ध असून या ठिकाणी येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, कामगार आणि संबंधित लोकांचे प्रमाण विचारात घेता हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे बाजार समिती सभापती ऍड संजय काळे याची सांगितले.

शरदचंद्रजी पवार भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयांत पोटभर जेवण हा उपक्रम स्तुत्य असून शेतकरी हिताचा उपक्रम सुरू केल्या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापती संजय काळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. शिवाय देण्यात येणाऱ्या भोजन थाळीची पहाणी करत थाळी विषय अधिक माहिती जाणून घेतली. या उपक्रमाचा शुभारंभ काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.

या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, धनेश संचेती, प्रकाश ताजणे, संतोष घोगरे, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, मोहित ढमाले, गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे, तुळशीराम शिंदे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शेतकरी देखील उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत चाळीस रुपयांत संपूर्ण भोजन देण्यात येणार आहे. डाळ, भात, चपाती, भाजी आदी पदार्थ असणार आहेत. या योग्य दर्जाचा आहार येथे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांची सोय होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता तरी सरकारला जाग येणार का? वीज भारनियमनाने घेतला शेतकऱ्याचा बळी
सोनं लवकरच दराचा रेकॉर्ड गाठण्याची भीती? शुक्रवारी सोनं महागले
Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..

English Summary: Now farmers have a cheap meal at the market committee; Inauguration by Ajit Pawar Published on: 23 April 2022, 03:34 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters