हलका तपकिरी रंग, आंबट गोड चव, तंतुमय पृष्ठभाग आणि हिरवी मांसाची किवी आता सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे.
मागील वर्षी डेंग्यूच्या वेळी भारतातील प्रत्येक व्यक्ती किवीचे सेवन करत होता तर त्याच्या गुणधर्मामुळेच भारतामध्ये किवी लोकप्रिय झाली आहे. किवी डेंग्यू-मलेरिया यांसारख्या रोगांवर खूप प्रभावी ठरते. हे फळ किलोमध्ये विकले जात नाही तर किवीचे एक फळ २० रुपये ते ५० रुपयांपर्यंत विकले जाते.
शेतकरी किवीची एका हेक्टरमध्ये लागवड करून २५ लाखांपर्यंत नफा मिळवू शकतो. किवीमध्ये जीवनसत्त्वे ब आणि क आणि फॉस्फरस, पोटॅश आणि खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.तर कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही अधिक प्रमाणात उपलब्ध असतात.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे बरेच चांगले गुण किवीमध्ये आहेत. तसेच आपल्याला अनेक रोगांशी लढण्यास किवी मदत करते.
किवीचे नियमित सेवन करणे आपल्या झोपेसाठी चांगले असते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत करते. किवीचे सेवन करणे आपल्या डोळ्यांसाठी देखील चांगले असते. किवी हे एक अत्यंत गुणकारी असे फळ आहे.
भारतामध्ये किवीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात
चीनमध्ये किवीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते तर न्यूझीलंडमध्ये त्याचे व्यावसायिकीकरण केले गेले आहे.
आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्याची लागवड होत आहे. भारतातामध्ये अनेक राज्यात अगदी यशस्वीरित्या किवीचे उत्पादन घेतले जात असून हिमाचल,
केरळ, उत्तर प्रदेश आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे.
किवीसाठी उपयुक्त हवामान आणि जमीन
किवी फळाची वेल द्राक्षासारखी असते तर हिवाळ्यात त्याची पाने पडतात. भारतातील सौम्य उप-उष्णकटिबंधीय आणि सौम्य समशीतोष्ण हवामान प्रदेश ज्यांचे समुद्रसपाटीपासून 000 ते 2000 मीटर उंची, सरासरी ५० सेमी वार्षिक पाऊस आणि हिवाळ्यात ७ °C तापमान ०० च्या आसपास असते अश्या ठिकाणी किवीची लागवड अगदी सहज करता येते.
जोरदार उष्णता, वादळ आणि गारपीट याशिवाय झाडांची पाने, फुले व फळे यांचेही नुकसान होण्याची शक्यता असते.
त्यामुळे हवेस अडथळा निर्माण केल्यास तसेच योग्य वेळी योग्य पद्धतीने सिंचन दिल्यास किवीची वाढ उत्तम होवू शकते.
किवीची लागवड खोल, सुपीक, चांगला निचरा होणारी, वालुकामय चिकणमाती मध्ये करता येते. मातीचा सामू ph ५.० ते ६.० च्या दरम्यान असावा. पाण्याचा उत्तम निचरा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.
किवीच्या भारतीय जाती
भारतातील किवी फळांच्या मुख्य जाती अॅलिसन, ब्रुनो, हेवर्ड, मॉन्टी, अॅबॉट, अॅलिसन आणि टोमुरी या आहेत.
किवी पिकाची योग्य पद्धतीने लागवड आणि व्यवस्थापन केल्यास तुम्ही वर्षाकाठी २५ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
Share your comments