1. कृषीपीडिया

दुर्मिळ माहिती:पानवेलच्या 'या' जातींची लागवड करा आणि मिळवा 9 ते 15 वर्षांपर्यंत पैसा

पानवेल हे सगळ्यांना माहिती असून भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. एक वेलवर्गीय वनस्पती असून सदाहरित, बहुवर्षीय आणि एकलिंगी वेल आहे. बरेचजण जेवणानंतर पान खातातकारण हे पान पचनास मदत करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this four veriety of betel leaf crop is give more production and more income to farmer

this four veriety of betel leaf crop is give more production and more income to farmer

पानवेल हे सगळ्यांना माहिती असून भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. एक वेलवर्गीय वनस्पती असून सदाहरित, बहुवर्षीय आणि एकलिंगी वेल आहे. बरेचजण जेवणानंतर पान खातातकारण हे पान पचनास मदत करतात.

पानवेली च्या पानांमध्ये ब आणि क जीवनसत्त्वे खूपच प्रमाणात असतात.मानवी मेंदू,हृदय आणि यकृत या इंद्रियांना पान पौष्टिक व बलवर्धक ठरलेले आहे. तसेच पानवेल मध्ये मोठ्या प्रमाणात क्लोरोजेनिक आमल असल्यामुळे त्याचा उपयोग कॅन्सर कमी करण्यासाठी देखील होतो.

हे पिक नैसर्गिक सावली मध्ये किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या किंवा नारळ, सुपारीच्या बागा मध्ये घेतले जाते. एकदा लागवड केली की नऊ ते पंधरा वर्षांपर्यंत सातत्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा देण्याचे काम हे पिक करते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, धुळे, जळगाव आणि औरंगाबादव बऱ्याच इतर जिल्ह्यांमध्ये देखील पानवेलीची लागवड केली जाते. या लेखामध्ये आपण पानवेलच्या काही उत्पादनक्षम आणि चांगले नफा देणाऱ्या जातींची माहिती घेऊ.

 पानवेलच्या चांगल्या उत्पादनक्षम जाती

1- कृष्णा-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या ठिकाणाहून कपूरी पानाच्या जातीमधून निवड पद्धतीने कृष्णा पान ही जात विकसित करण्यात आले आहे.

या जातीची पाने जाड व मोठे, आकाराने लंबगोल, शेंड्याकडे निमुळती  दिसायला आकर्षक असतात. या जातीच्या पानांचा टिकाऊपणा 17 दिवस असतो. इतर जातींपेक्षा या जातीपासून 27 टक्के अधिक उत्पादन मिळते.

2- बांगलावर्गीय- या जातीच्या पानांमध्ये वेगवेगळे 35 प्रकार असून यामध्ये देशी बांगला, कलकत्ता बांगला, घाणे घाटी आणि अमाइल या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत. या जातीची पानवेल वेगाने वाढते. पानाचे देठ लहान असते व आकार मोठा असून रंग फिक्कट हिरवा  व त्याला पिवळसर छटा असते. चवीला जास्त तिखट असते.

3- देशावरी- या जातीचे पानवेलचे चार वेगवेगळे प्रकार असून यामध्ये देशी देशावरी, मोहबा देशावरी,  मालवी देशावरी आणि करूबाळी या नावाने ओळखले जातात. देशावरील पानवेली च्या जातीचा पानांचा आकार  मोठा, लंबगोलाकार आणि आखुड टोकाची आणि चवीला मध्यम गोड असतात.

4- कपुरी- व्यापारी तत्त्वावर जवळजवळ पंचवीस कपूरीचे प्रकार आहे. महाराष्ट्रात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

या जातीच्या पानवेली च्या पानांचामध्यम वाढ, टोकाकडे निमुळती होणारी आखूड पाने, फिक्कट पिवळसर ते फिक्कट हिरवा रंग, कमी दशी व तिखटपणा हे कपूरी पानांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Intercroping:कमी जागेत आणि कमी वेळेत मिळवायचे असेल जास्त उत्पन्न तर फळबागांमध्ये 'फुलांचे आंतरपीक' ठरेल उत्तम पर्याय

नक्की वाचा:गुलाबराव पाटलांचा स्वपक्षाच्या कृषी खात्याला अल्टिमेटम! कृषी विभागातील जागा भरा नाहीतर 'मंत्रालय हलवून टाकेल'

नक्की वाचा:गोव्यात लवकरच कृषी आणि फलोत्पादन विद्यापीठ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

English Summary: this four veriety of betel leaf crop is give more production and more income to farmer Published on: 07 May 2022, 01:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters