1. कृषीपीडिया

या शेतकऱ्याने शेतात पिकवला दुप्पट दर देणारा गहु.

औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शेती केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच एक अनोखा प्रयोग (Experiment) केला आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
या शेतकऱ्याने शेतात पिकवला दुप्पट दर देणारा गहु.

या शेतकऱ्याने शेतात पिकवला दुप्पट दर देणारा गहु.

औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शेती केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच एक अनोखा प्रयोग (Experiment) केला आहे. आजपर्यंत तुम्ही लाल गहू, तांबुस गहू ऐकला असेल पण फुलंब्री तालुक्यातील कृष्णा फालके या शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची शेती ( Black wheat cultivation) केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील कृष्णा फालके या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात आजपर्यंत वेगवेगळे प्रयोग (Experiment)केले असून सध्या त्यांनी काळ्या गव्हाची लागवड केली आहे. कृष्णा यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक हजेरी लावत आहेत. येत्या दोन महिन्यांत हा गहू काढणीसाठी तयार होईल.

आरोग्यासाठी उपयुक्त गहू

नॅशनल ॲग्री फूड बायॉटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, मोहाली, पंजाब येथील प्रयोग शाळेत डॉ. मोनिका गर्ग यांनी काळ्या गव्हाच्या वाणावर संशोधन (Research)केले असून या गव्हात शरीरास उपयोगी अश्या झिंक, मॅग्नेशियम, लोह, ॲथोसायनिन याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शरीराची झिज लवकर भरून निघते. या गव्हात शर्करेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेहासारख्या आजरासाठी फायदाच होईल, 

तसेच काळ्या गव्हाला पाणी कमी लागते, तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही आणि फुटव्याची संख्या अधिक असल्यामुळे बियाणे कमी लागते. या गव्हाचा दर सध्या गव्हापेक्षा दुप्पट असून तब्बल ६ हजार ५०० रुपये क्विंटल प्रमाणे विकला जातो.

English Summary: This farmer take dubble rate give wheat Published on: 20 January 2022, 08:48 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters