हवामान अंदाज व कृषी सल्ला
भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पश्चिमी चक्रवातामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने दि. 08, 09 व 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची तर दि.09 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची तर दि. 10 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला
संभाव्य अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बंधूंनी कापणी/मळणी केलेले पीक/शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी.
साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा.संभाव्य अवकाळी पावसाची शक्यता पाहता, शेतकऱ्यांनी शेतातील खत देणे, फवारणी, आंतरमशागत, पेरणी,ओलीत करणे इ. कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पाऊसमान पाहून करावीत.
मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांची जिवीतहानी होऊ नये म्हणून शेतकरी बंधूंनी आपापली जनावरे गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावी, झाडाखाली बांधू नये.
विजांच्या कडकडाटाची अचूक माहिती, अंदाज व सावधानतेचा इशारा प्राप्त करण्यासाठी "दामिनी" या मोबाईल ॲप'चा वापर करावा.
दि. 08, 09 व 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची तर दि.09 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची तर दि. 10 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामूळे ज्याप्रमाणे कृषी सल्ला या लेखामध्ये दिलेला आहे त्याच प्रमाणे शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी योग्य व्यवस्थापन पिकांचे करावे.
Share your comments