‘ही’ आहे पशुसंवर्धन विभागाची नवीन योजना पॉर्नस्टार असून शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे जाणून घेऊ सविस्तर
नागपूर : शेतकरी वर्गाला शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. यासाठी शासनाकडून विविध योजनाही राबविण्यात येतात.याच धर्तीवर आता पशुसंवर्धन विभागाकडून उद्योजगता व कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय पशुसंवर्धन योजना २०२१-२२ या वर्षापासून राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय पशुसंवर्धन योजना २०२१-२२
या योजनेद्वारे शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर, फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदान (subsidy) मर्यादित रकमेपर्यंतच मिळणार असून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम बँकांकडून कर्ज म्हणून घ्यावी लागणार आहे.
व्यवसायासाठी अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे आहे
१)शेळी-मेंढी पालन-50 लाख रुपये
२) कुक्कुट पालन – 25 लाख रुपये
३) वराह पालन -30 लाख रुपये
४) पशुखाद्य व वैरण विकासासाठी 50 लाख रुपये
योजनेचा लाभ घेण्यासाठी
व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसहाय्यता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी जोखीम गट (जेएलजी) सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून अर्जासोबत प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक ही महत्त्वाची कागदपत्रे (Documents) जोडणे गरजेचे आहे. या योजने संदर्भात अधिक माहिती
आणि मार्गदर्शक सूचनांसाठी http://ahd.maharashtra.gov.in किंवा http://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळाला (Website) भेट द्या.
पशुसंवर्धन विभागाच्या ( Animal Husbantry Deparment) या योजनेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा (Skim) लाभ घ्यावा.
Share your comments