शेतकरी मित्रांनो, बहुतांशी शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवणुकीसाठी सल्फर चा बुरशीनाशक म्हणून वापर मोठ्या प्रमाणात करतात.
सल्फर चाळीमध्ये कापरण्याचे फायदे:-
सल्फर 80% WDG हे उकृष्ट स्पर्षजन्य बुरशीनाशक म्हणून काम करते, म्हणून ते चाळीमध्ये येणाऱ्या सर्व बुरशीजन्य रोगांना आटोक्यात ठेवते, परंतु बरेचशे शेतकरी सल्फर चा वापर करत असतांना ते कोणत्या स्वरूपातील आहे याचा विचार न करता कोणत्याही स्वरूपातील सल्फर चा वापर कांदा चाळीमध्ये करतात व अपेक्षित परिणाम मिळत नाही.
मार्केट मध्ये मिळणाऱ्या सल्फर चे प्रकार
१. बेन्टोनाईट 90% सल्फ
२. 90% WG फॉर्म मधील सल्फ
३. 80% WDG फॉर्म मधील सल्फ
४. डस्टिंग सल्फ
वरील सर्व सल्फर चे काम व वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे, बरेच शेतकरी 90% चे फर्टीलायझर म्हणून वापरायचे सल्फर किंवा डस्टिंग सल्फर सुद्धा कांदा चाळीमध्ये बुरशीनाशक म्हणून करत असतात, हे संयुक्तिक नाही.
ज्या सल्फर च्या पुड्यावर CONTACT FUNGICIDE असे लिहिलेले आहे तेच सल्फर उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून कांदा चाळीमध्ये काम करते.
बरेच शेतकरी सल्फर मुळे कांद्याचा कलर डाऊन होतो असे म्हणतात परंतु खराब क्वालिटी व स्वस्त दर असलेल्या सल्फर चा वापर केल्यास कांद्याची क्वालिटी खराब होऊ शकते आणि यात चांगल्या सल्फरचीही बदनामी होते.
थायोसल्फ 80% WDG सल्फरचाच वापर का?
1. थायोसल्फ मध्ये उत्कृष्ट प्रतीचे Sticking agent, Spreading Agent आणि Dispensing agent (चीपकवनारा पदार्थ, सूक्ष्म कणांना पसरवणारा पदार्थ) वापरले असल्याकारणाने ते चाळीत टाकल्यावर आद्रतेनुसार कांद्यावर पूर्णतः पसरते व स्पर्षजन्य बुरशीनाशक म्हणून उत्कृष्ट काम करते
2. थायोसल्फ ची पार्टीकल साईज ही 2-4 मायक्रोन असल्यामुळे ते कांद्याच्या पृष्ठभागावर सुंदर पसरते, त्यामुळे कांद्यचा कलर डाऊन होण्याची समस्या कमी होते
3. थायोसल्फ स्प्रे ड्राईंग तंत्रज्ञानाने बनवले जाते म्हणून एकसारखा आकार व सल्फर ची प्रत्येक कणाकणात टक्केवारी मिळण्यास मदत होते
Share your comments