पिकांसाठी आणि फळबागांची उपयुक्त खते-
१) 19:19:19- या खताला स्टार्टर ग्रेड म्हणतात. या खतांमध्ये प्रामुख्याने नत्र अमाइड,अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा(water solubles)उपयोग पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेतशाकीय वाढीसाठी होतो.
२) 12:61:00- या खताला मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. (वॉटर सोलुबल) यामध्ये अमोनिकल स्वरूपाचा नत्र कमी असतो. पाण्यामध्ये विरघळणाऱ्या स्फुरदाचे जास्त प्रमाण असते. मुळांच्या वाढीसाठी आणि पिकांच्या पुनरुत्पादनासाठी उपयोग होतो.
३) 00:52:34- या खताला मोनोपोटॅसियम फॉस्फेट म्हणतात. स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये जास्त असतात. फुले लागण्याच्या आधी आणि फुले लागल्यानंतर हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्येतर डाळिंबाच्या कातड्याला रंग येण्यासाठी हे वापरले जाते.
४) 13:00:45-या खताला पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.नत्राचे प्रमाण हे कमी असून पाण्यातमध्ये विद्राव्य पालाशचे प्रमाण हे जास्त असते. पक्व अवस्थेमध्ये या (वॉटर सोलुबल) ची गरज असते.या खताचा वापर केल्याने अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
5) 13:40:13- (वॉटर सोलुबल)टोमैटो ची (टोमैटो)जर फुले गळत असतील तर त्या खताचा वापर केल्याने फुलांची गळती थांबते.
6) कॅल्शियम नायट्रेट- मुळांची वाढ होण्यासाठी शेंगा वाढण्यासाठी किंवा पीक कटक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
7)24:24:00- या खतामध्ये नत्र हा नायट्रेट व अमोनिकल (Ammonial) स्वरूपातील आहे. याचा उपयोग फुलधारणा अवस्थेमध्ये करता येतो.
Share your comments