शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी कांदा पिकास चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला आहे. गेल्या वर्षीच्या कांदा लागवडीच्या हंगामामध्ये साठवण केलेल्या कांद्यास बाजारात चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या कांद्याचा कमी प्रमाणात वापर केला असण्याची शक्यता आहे.त्यामुळे चालू वर्षीच्या रब्बी हंगामात चांगल्या कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की आपणाकडे विक्रीसाठी उपलब्ध होणारे कांदा बियाणे आपण विक्री वेळी शेतकऱ्यांना खालील सूचना देऊनच विक्री करावी. म्हणजे बियाणे उगवणीच्या तक्रारींचे प्रमाण कमी राहील.
१ शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी चांगली सुपीक व निचऱ्याची जमीन निवडावी.उगीच समस्यायुक्त, हरळी,लव्हाळा यासारखी तणे असणारी, तणनाशकांच्या अतिवापराने खराब झालेली, क्षारपड,चोपण असलेली जमीन निवडू नये.२.शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्यापूर्वी रोपवाटिका क्षेत्रावर चांगले कुजलेले शेणखत व ट्रायकोडर्मा पावडर यांचे मिश्रण करून चांगले मिसळून घ्यावे व गादीवाफे तयार करावेत.३.कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रत्येक कांदा बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यास बियाण्याबरोबर चांगल्या प्रतीची ट्रायकोडर्मा पावडर उपलब्ध करून द्यावी व वापराबाबत मार्गदर्शन करावे.४.शेतकऱ्यांना लागवड क्षेत्राच्या दहा टक्के क्षेत्रावर रोपवाटिका करण्यास सांगावे. कमी क्षेत्रावर जास्त दाट लागवड करू नये.५.कांदा बियाणे रोपवाटिकेमध्ये तयार करण्यासाठी गादीवाफ्यांचाच वापर करावा.
एक मीटर रुंदीचे, १५ सें.मी. उंचीचे व ३-४ मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत.प्रत्येक गादीवाफा करतांना युरीया ५० ग्रॅम व सुफला (१५:१५:१५) १०० ग्रॅम मिसळून गादीवाफा सारखा करावा.६. गादीवाफा पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे व सपाट वाफा पद्धतीने होणाऱ्या नुकसानीची कल्पना द्यावी.७. गादीवाफ्यावर पेरणी करतांना १० सेंमी.अंतरावर २ सेंमी.खोलीच्या समांतर रेषा पाडून बियाणे पेरावे व मातीने झाकावे. एक चौरस मीटर क्षेत्रावर १० ग्रॅम बियाणे पेरावे. पेरणी पुर्वी प्रतिकिलो बियाण्यास २-३ ग्रॅम कार्बेन्डेझिम (बावीस्टीन) चोळावे. बियाण्याची उगवण चांगली होईपर्यंत झारीने पाणी द्यावे.जमिनीतील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीवेळी फोरेट सारख्या किटकनाशकांचा पेरणी वेळी वापर करण्यास सुचवावे.८.रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा चांगला असावा,तसेच वेळेवर तणनियंत्रण व कीड नियंत्रण करावे.
Share your comments