
यावर्षी अमेरिकेतून सर्वांत जास्त युरिया केला जाणार आयात
देशात मान्सूनचे आगमन झाले असून शेतकरी पेरण्या आणि लागवडीच्या लगबगीला लागले आहेत. दरम्यान पिकाच्या वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरियाला भारतात खरीप हंगामात खूप मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर भारताकडून अमेरिकेतून युरिया आयात केला जात आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यावर्षी भारत सर्वांत जास्त युरिया आयात करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी भारतासाठी युरिया आयात करत आहे. तब्बल ४७ हजार टन युरिया अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स बंदरावरून लोड करण्यात येत आहे.
हा युरिया पश्चिम भारतातील न्यू मंगळूर बंदरावर आणला जाणार आहे. कोरियाची ही कंपनी युरिया वाहतुकीसाठी एका टनासाठी ७१६ अमेरिकन डॉलर रूपये आकारणार आहे. दरम्यान अमेरिकेकडून एका टनामागे मालवाहतूक, लोडिंग आणि कर असा मिळून ६३५ ते ६४० अमेरिकन डॉलर एवढी किंमत आकारली जाणार आहे.अमेरिका अधूनमधून युरिया निर्यात करणारा देश आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भारतातील निर्यात केवळ 1.47 टन, 2020-21 मध्ये 2.19 टन आणि 2021-22 मध्ये 43.71 टन होती. दरम्यान यावर्षी ४७ हजार टन युरिया आयात केला जाणार आहे.
दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी भारतासाठी युरिया आयात करत आहे.तब्बल ४७ हजार टन युरिया अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स बंदरावरून लोड करण्यात येत आहे.हा युरिया पश्चिम भारतातील न्यू मंगळूर बंदरावर आणला जाणार आहे. कोरियाची ही कंपनी युरिया वाहतुकीसाठी एका टनासाठी ७१६ अमेरिकन डॉलर रूपये आकारणार आहे. दरम्यान अमेरिकेकडून एका टनामागे मालवाहतूक, लोडिंग आणि कर असा मिळून ६३५ ते ६४० अमेरिकन डॉलर एवढी किंमत आकारली जाणार आहे.अमेरिका अधूनमधून युरिया निर्यात करणारा देश आहे.
हे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या आयात निविदेच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे.युरियासाठी जागतिक निविदा ११ मे रोजी निघाल्या होत्या.पुढील महिन्यांत अमेरिकेकडून आणखी जहाजे येण्याची शक्यता आहे. हे आमच्या आयात स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यात आणि इतर पुरवठादारांना संदेश पाठवण्यास मदत करेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.दरम्यान भारताने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०.१६ मेट्रिक टन युरिया आयात केला होता.त्यासाठी भारताने ६.५२ बिलियन डॉलर एवढे रक्कम दिली होती. दरम्यान चीन. ओमान, कतार इजिप्त, युक्रेन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात युरिया आयात केला जातो.
Share your comments