रासायनिक खतांचा आणि विद्राव्य खतांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना विद्राव्य खतांची पूर्ण माहिती नसल्यामुळे विद्राव्यखतांच्या नावाखाली पावडर विकली जाण्याचे प्रकार घडतात. विद्राव्य खते ही साधारणपणे नायट्रोजन, फास्फोरस आणि पोटॅशियम या तीन मूलद्रव्यांपासून तयार केलेले असतात.
त्यांना मोड आल्यापासून ते फळधारणा पर्यंत पिकांच्या प्रत्येक अवस्थेसाठी यातीनमूलद्रव्यांची बाकीच्या इतर उपयुक्त घटक का बरोबर विविध प्रकारे मिश्रण करून वेगवेगळ्या प्रकारची खते तयार करण्यात येतात. वर्षानुवर्षे विविध प्रकारची पिके घेतल्याने मातीतील आवश्यक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी वेगळ्या खतांची आवश्यकता असते. परंतु हे खत भेसळयुक्त नसणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आपण काही महत्त्वाच्या रासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी याची माहिती घेऊ.
रासायनिक खतांची शुद्धता कशी तपासावी?
- युरिया- तपास नळीत एक ग्रॅम युरिया, पाच ते सात थेंब सिल्वर नाइट्रेट, 5 मी डिस्टिल्ड वॉटर मिसळून ढवळल यास द्रावण पांढरे झाल्यास समजावे समजावे युरियातभेसळ आहे किंवा एक ग्रॅम युरिया तपासणीत गरम केल्यास संपूर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे असे समजावे.
- डीएपी- एक ग्रॅम डीएपी खत, पाच मिलि डिस्टिल्ड वॉटर,01 मिली आम्ल मिसळून हलवा. संपूर्ण डीएपी विरघळले नाहीतर भेसळ आहे असे समजावे.
- म्युरेट ऑफ पोटॅश-01 ग्रॅम खत, 10 मिली पाणी तपास नळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे. याशिवाय पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ आहे असे समजावे.
- सिंगल सुपर फास्फेट- एक ग्रॅम खत, पाच मिनिट डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये एक थेंब(2 टक्के)डिस्टील्डअमोनियम हायड्रॉक्साइड आणि एक मिली सिल्वर नायट्रेट मिसळले तर द्रावणासपिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.
- फेरस सल्फेट- 1 ग्रम खत आणि पाच मिलि पाणी मिसळा. त्यात एक मुली पोटॅशियम फेरोसीनाईडमिसळल्यास मिश्रण निळे बनेल. अन्यथा भेसळ समजावे.
( संदर्भ- कृषीमंत्र)
Share your comments