भूमिका फक्त बघ्याची आणि लाचारीनं सहन करण्याची असेल तर ही लाजवाणी गोष्ट आहे.आपलं हित दुसरा कुणी करेल..आपल्यासाठी दुसरा कुणी लढेल. संघर्ष करेल नं मी मात्र सोयिस्कर या संघर्षपासून दूर असेल हे निव्वळ षंडपणाचे लक्षण आहे. व्यवस्था परिवर्तनाची ताकद फक्त शेतकरी आणि कामगार यांच्यात आहे.इतिहास साक्षी आहे ज्या ज्या वेळेस जगात कुठल्याही देशात क्रांती झाली असेल तर त्याची मशाल या दोन घटकांच्याच हातात होती.मदमस्त भांडवलदार आणि स्वार्थी राजकारणी कधीही व्यवस्था परिवर्तन घडवू इच्छित नसतात कारण ते त्यांच्या नफेखोर प्रवृत्तिला मारक असते.
जो-जो शेतीच्या प्रश्नाविषयी आवाज उठवेल ..संघर्ष करेल..त्याला तन- मन- धनानं साथ देण ही शेतकरी म्हणून आपली प्रार्थमिकता असली पाहिजे..जिथे जिथे लुटीची व्यवस्था लक्षात येईल तिथे तिथे त्या व्यवस्थेविरुद्ध स्वता संघर्ष करायला हवा अन जर दुसरा कुणी संघर्ष करत असेल तर आपली काम थोड़ी बाजूला ठेवून त्याला प्रत्यक्ष साथ दिली पाहिजे.
आपली परावलंबी व् निमुटपनानं सहन करण्याची..संघर्ष नं करता फक्त बघ्याची भूमिका आपल नुकसान तर करतेच आहे
परन्तु पुढच्या पिढीला ही आपन फक्त बघे आणि षंड बनवत आहोत.शेतीत कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थित संघर्ष करण्याची ज़िद्द असलेला शेतकरी या लुटीच्या व्यवस्थेबरोबर ही तितक्याच जिद्दी नं अन ताकदीने संघर्ष करू शकतो.
हे दाखवून दयायला हव अन त्यासाठी गावोगावी तरुण शेतकऱ्यांनी पक्ष.जाती विरहित एकत्र यायला हव तरच काही परिवर्तन घडू शकते अन्यथा नाहीच.
Share your comments