असं म्हणतात संघर्षाचे काटे ओलांडल्या शिवाय समोरची हिरवळ दिसत नाही. हे खरं आहे मात्र संघर्ष हा सर्वात जास्त शेतकरी आणि शेतकरी पुत्राच्याच वाट्याला जास्त असतो, हे सध्याचा काळ आणि मागचा इतिहास आपल्याला दाखवत असतो.तशीच एक संघर्षगाथा आहे. अनेकांना थक्क करणारी वयाच्या 27 व्या वयापर्यंत सतत काटेरी वाटेने प्रवास करणारा अवलिया म्हणजे जालना
जिल्यातील आणि राजूर तालुक्यातील चनेगावात जन्म घेतलेला तरुण लक्ष्मण मुटकुळे यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण हे गावातली प्राथमिक शाळेतच पूर्ण केले. घरची परिस्थिती हालाखीची आणि बेताची होती.The situation at home was dire and desperate. लक्ष्मण हे वर्ग अकरावी व बारावीमध्ये असताना शिक्षणासोबतच मजुरी करत असत. देशसेवेसाठी सैन्यात भरती होणे हेच त्याचे स्वप्न होते. सोबतच त्यांनी सैन्यादलाच्या भरती साठी प्रचंड
मेहनत घेतली अनेक वेळा भरती सुद्धा मारली परंतू जे व्हायचे नव्हते तेच झाले. लक्ष्मण यांची उंची पात्रता कमी पडत होती त्यामुेच त्यांना या स्वप्नाकडे पाठ फिरवावी लागली. ते तेवढ्यावर च थांबले नाहीत तर नाही देशसेवा करता आली तर उच्चशिक्षित होऊन समाजसेवा आपण चांगल्या पद्धतीने करु हा ध्यास मनी धरला आणि शिकण्याची जिद्द लक्ष्मण यांच्या अंगी होतीच त्यामूळे त्यांनी औरंगाबाद च्या देवगिरी
या कॉलेज मध्ये BA साठी प्रवेश घेतला त्यानंतर याच महाविद्यालयातुन (msw) मास्टर इन सोशल वर्क या पदवी साठी प्रवेश घेतला. उत्तम पद्धतीने सर्व शिक्षण सुरू असताना काळाने त्यांच्या आरोग्यावर घाव घालण्याचे ठरवले त्यांना ब्रेन ट्युमर नावाचा भयानक आजार झाला.आता अशा संकटाच्या कचाट्यात सापडल्यानंतर या आजाराचे निदान, वैद्यकीय खर्च करणार तरी कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतु
असं म्हणतात देव तारी त्याला कोण मारी? त्याच संकटाच्या काळात कॉलेजचे मित्र -मैत्रिणी, प्राध्यापक वर्ग एकवटला आणि सर्वांनी होईल तेव्हढे पैसै गोळा केले गेले. अणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व ती यशस्वीसुद्धा झाली. आणि काही दिवसातच लक्ष्मण यांच पोस्ट ग्रॅ्जुशन चे शिक्षण ही पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी ठरवले की आता समाजाच्या हितासाठी आणि आपलीही अर्थिक
बाजू मजबूत होईल यासाठी प्रयत्न करू. तेव्हा त्यांनी जालना येथील वरद क्रॉप सायन्स या कंपनी मध्ये नोकरी केली आणि आजही ते तिथेच उत्तम सेवा शेतकऱ्यांसाठी देत आहे.ही लक्ष्मण मुटकुळे यांची प्रेरणादायी आणि संघर्षदायी कथा राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
लेखक - गोपाल उगले
Share your comments