1. कृषीपीडिया

जामून शेतीचा असेल जर विचार, तर; जाणुन घ्या जामूनच्या टॉप सहा जातीबद्दल!

भारत ही जगाची मधुमेहाची राजधानी आहे आणि बहुतेक घरांमध्ये मधुमेह आपल्याला आढळून येईल, ज्याला 'साखर रोग' म्हणून ओळखले जाते. मधुमेह ही प्रामुख्याने जीवनशैलीची स्थिती आहे जी भारतातील सर्व वयोगटांमध्ये चिंताजनक वाढली आहे आणि तरुण लोकसंख्येमध्ये त्याचा प्रसार 10% पेक्षा जास्त झाला आहे. शहरी भागातील परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा वाईट आहे, जिथे रोगाचा प्रसार सर्व सामाजिक-आर्थिक गटांमध्ये जवळजवळ दुप्पट आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
blackberry

blackberry

भारत ही जगाची मधुमेहाची राजधानी आहे आणि बहुतेक घरांमध्ये मधुमेह आपल्याला आढळून येईल, ज्याला 'साखर रोग' म्हणून ओळखले जाते. मधुमेह ही प्रामुख्याने जीवनशैलीची स्थिती आहे जी भारतातील सर्व वयोगटांमध्ये चिंताजनक वाढली आहे आणि तरुण लोकसंख्येमध्ये त्याचा प्रसार 10% पेक्षा जास्त झाला आहे. शहरी भागातील परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा वाईट आहे, जिथे रोगाचा प्रसार सर्व सामाजिक-आर्थिक गटांमध्ये जवळजवळ दुप्पट आहे.

मधुमेहामध्ये सध्या वाढ, विशेषत: तरुण लोकसंख्येमध्ये, सार्वजनिक आरोग्याच्या मोठ्या चिंतेचे कारण आहे. अशा परिस्थितीत आरोग्यासाठी घातक गोष्टींच सेवन टाळणे अपरिहार्य ठरते. जामून ही असे फळ आहे जे मधुमेह झालेल्या व्यक्तीसाठी उत्तम आहे याचा मधुमेह असलेल्या रुग्णाला काही त्रास नाही. चला तर मग जाणुन घेऊ जामून पिकाच्या वाणीविषयी.

जामुन उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या ठिकाणी यशस्वीरित्या घेतले जाऊ शकते.  भारतात,थंड प्रदेश वगळता कुठेही लागवड करता येते.

त्याच्या झाडावर हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्याचा विशेष परिणाम होत नाही. पण हिवाळ्यातील दंव आणि उन्हाळ्यात जास्त कडक ऊन त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वळलाय, त्यामुळे मोठी फळे आणि लहान बिया असलेल्या जामुनाची विविधता लोक जास्त पिकवतात.

जामुनच्या अनेक सुधारित जाती विकसित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पसंतीमुळे अनेक जाती अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.

 राजा जामुन

जामुनाची ही जात भारतात अधिक पसंत केली जाते. या जातीची फळे मोठी, आयताकृती आणि गडद जांभळ्या रंगाची असतात. त्याच्या फळांमध्ये आढळलेल्या बीचा आकार लहान असतो. त्याची फळे पिकल्यानंतर गोड आणि चविष्ट होतात.

 I. S. H. J.- 45

ही जात सेंट्रल फॉर सब-ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर ,लखनऊ, उत्तर प्रदेश ह्या संस्थेने विकसित केली आहे. या जातीच्या फळांमध्ये बिया नसतात. या जातीची फळे साधारण जाडीसह अंडाकृती दिसतात. ह्या फळाचा पिकल्यानंतर रंग काळा आणि गडद निळा होतो. या जातीची फळे रसाळ आणि चवीला गोड असतात. या जातीची झाडे गुजरात आणि उत्तर प्रदेशात जास्त वाढतात.

C.I.S.H.J. - 37

या जातीची फळे गडद काळ्या रंगाची असतात.जे पावसाळ्यात पिकून तयार होतात.  त्याच्या फळांमधील बियांचा आकार लहान असतो. त्याचा गर गोड आणि रसाळ असतो.

 काथा

या जातीची फळे आकाराने लहान आहेत.  ज्याचा रंग गडद जांभळा आहे. या जातीच्या फळांमध्ये गराचे प्रमाण कमी असते. जे चवीला आंबट असते. त्याच्या फळांचा आकार बोरीसारखा गोल आहे.

गोमा प्रियांका

ही जात केंद्रीय फलोत्पादन प्रयोग केंद्र गोधरा, गुजरात यांनी विकसित केली आहे. या जातीची फळे चवीला गोड असतात. जे खाल्ल्यानंतर तुरट चव देतात. गराचे प्रमाण या फळांमध्ये जास्त आढळते.

या जातीची फळे पावसाळ्यात पिकून तयार होतात.

 भादो

या जातीची फळे साधारण आकाराची असतात.  ज्याचा रंग गडद जांभळा आहे. या जातीच्या वनस्पती उशिरा उत्पन्नासाठी ओळखल्या जातात. या जातीत ऑगस्ट महिन्यात पावसाळ्यानंतर फळे तयार होतात. या जातीच्या फळांची चव आंबटपणासह किंचित गोड असते.

 

English Summary: the species of blackberry Published on: 14 September 2021, 11:17 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters