नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत.नत्र युक्त खते वापरण्यापुर्वी जमिनीत सेंद्रिय पदार्थ जी पुर्ण पणे कुजलेली असतिल केवळ तीच, योग्य प्रमाणात असावीत.ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, मात्र जमिन भारी आहे, अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट कशाचा ही वापर हा फायदेशिर ठरतो.मात्र ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, तसेच जमिन हलकी आहे अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट चा वापर हा जास्तीत जास्त वेळेस विभागुन
असा करवा. हि खते सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करुनच द्यावीत.These fertilizers should be mixed with organic matter.ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेट चा वापर हा सामु कमी करणे
सर्व पिकांसह कांदा रोपात पिळ पडणे, कूज होणे, पिवळे होणे यासाठी हा आहे खात्रीलायक उपाय
आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो. कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते.जर ह्युमिक अँसिड चा वापर होणार असेल तर त्यात
युरिया विरघळवुन त्याचा वापर करावा. कारण ह्युमिक अँसिड ची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही फार जास्त असते,ज्यामुळे व्होलाटायझेशन तसेच जमिनीतल सामु वाढणे व कॅल्शियम कार्बोनेट तयार होणे, यास काही प्रमाणात प्रतिंबध घालता येईल.स्लरी चा वापर होणार असेल तर त्यात नत्र युक्त खतांचा वापर करुन नये, कारण अशा परिस्थितीत ज्यावेळेस स्लरी ही 7-8 दिवस कुजत राहते त्यावेळेस व्होलाटायझेशन हे वेगाने होते. स्लरी मधे सेंद्रिय
स्वरुपातील नत्र हे नैसर्गिक रित्या जास्त असते, त्यामुळे त्यात वरुन नत्र युक्त खते देवुन फायदा नाही.ज्य जमिनीत अर्धवट कुजलेले किंवा न कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात अशा जमिनीत व्होलाटायझेशन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीच्या थरात केव्हाही अर्धवट कुजलेले पदार्थ गाडु नयेत विशेष करुन तेव्हा जेव्हा शेतात पिक असते, अशा पदार्थांची कुजण्याची क्रिया ही पुर्ण झालेली असल्यानंतरच त्यांचा वापर शेतात करावा.नत्र युक्त खते हि जमिनीत काही अंतरावर खोलवर गाडुन अशा प्रकारेच द्यावीत.
श्री शिंदे सर
9822308252
Share your comments