
dew on crop
देशात हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे, गुलाबी थंडीची चाहूल चांगलीच भासत आहे, ह्या थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात दड अर्थात दंव पडत असते. यामुळे पिकांवर मोठा विपरीत परिणाम होतो आणि मोठे नुकसान घडून येते. कांदा सारख्या नगदी पिकावर याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम पाहायला मिळतो
म्हणुन दंव पासून पिकाला वाचवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणुन आज कृषी जागरण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी दंव पासून पिकाला कसे वाचवले जाऊ शकते याविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन आले आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया.
पिकाला झाकून टाका
पिकांवर दड अर्थात दंव पडण्याची शक्यता दिसल्यास पिकांना गोणपाट, पॉलिथिन किंवा पेंढ्याने झाकून टाकावे. तसेच आपण वाऱ्याची दिशा बघून त्या दिशाच्या विरुद्ध बाजूने पोते बांधून घ्यावे.
शेकोटी करावी
तसेच जर रात्रीच्या वेळी दंव पडण्याची शक्यता असेल तर रात्रीच्या 12 ते 2 वाजेच्या दरम्यान पेरलेल्या/लागवड केलेल्या पिकाच्या आजूबाजूच्या बांधावर शेकोटी करावी. त्यामुळे शेतातील कचरा किंवा इतर टाकाऊ गवत देखील नष्ट करता येईल.
नेटकेच अंकुरण पावलेले पीक झाकून टाका
लहान पिक तसेच नुकतेच अंकुरलेले पिकाला दंवचा जास्त फटका बसतो, त्यामुळे अंकुरण पावलेल्या पिकाला पालापाचोळ्याच्या थराने झाकून टाकावे जेणेकरून त्या पिकाला नुकसान पोहचणार नाही. पण जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा उघडे ठेवले पाहिजे. किंवा आपण सकाळी पीक उघडे करून टाकावे.
पिकाला पाणी द्या
जेव्हा शेतात दंव पडण्याची शक्यता असते तेव्हा तुम्ही तुमच्या शेतपिकाला पाणी देऊ शकता. असे केल्याने तुम्ही तुमचे पीक दंवपासून वाचवू शकता.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पाणी दिल्याने तापमान 0 डिग्री सेल्सियसच्या खाली जाणार नाही. सोबतच दंव पडल्याने पिकांचेही नुकसान होणार नाही. लक्षात ठेवा पाणी पहाटेपासून सूर्योदयापर्यंत या काळात भरावे.
सल्फरिक ऍसिड फवारा
दंव पडण्याची शक्यता असल्यास पिकांवर सल्फ्युरिक ऍसिडचे 0.1 टक्केचे द्रावण फवारावे. हे द्रावण तयार करण्यासाठी, एक लिटर सल्फ्यूरिक ऍसिड 1000 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण वापरावे. यांची फवारणी तुम्ही 15 दिवसांच्या अंतराने करू शकता.
Share your comments