1. कृषीपीडिया

सुमिलचे 'ब्लॅकबेल्ट' करेल भात आणि इतर पिकांचे किडींपासून संरक्षण आणि होईल उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांना होईल फायदा

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
insect in paddy crop

insect in paddy crop

शेतकरी हे पिकांची लागवड करतात, तेव्हापासून तर ते पीक काढण्याची पर्यंत विविध प्रकारच्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  पिकांवर होणारा किडीचा प्रादुर्भाव ही सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असते. आता खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन,मका आणि भात या पिकांची लागवड केली आहे.

परंतु या पिकावर पडणारा पाऊस, नेहमीचे ढगाळ हवामान यामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील जास्त असतो. त्यामुळे शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर किडींच्या नियंत्रणासाठी करतात.

नक्की वाचा:Chilli Crop Management:'या' रोगाचे नियंत्रण कराल तरच मिळेल मिरचीपासून भरघोस उत्पादन, वाचा त्याबद्दल सविस्तर माहिती

या बाबतीत जर आपण भात पिकाच्या विचार केला तर यामध्ये खोडकीड म्हणजेच स्टेम बोरर ही कीड खूपच घातक असून त्यामुळे तांदळाची गुणवत्ता आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.

भात पिकाच्या कुठल्याही टप्प्यात या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या आणि इतर हानिकारक किडीपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी सुमील केमिकल्स लिमिटेडने जगातील पहिले ड्राय कॅप  तंत्रज्ञान पेटंट केलेले उत्पादन ब्लॅक बेल्ट लॉंच केले आहे.

नक्की वाचा:जाणून घेऊ कोणते बुरशीनाशक कोणत्या बुरशीचा नायनाट करते, वाचा या बुरशीनाशकांची महत्वाची कार्य

 ब्लॅकबेल्ट बद्दल माहिती

 हे CIB च्या 9(3) नोंदणी अंतर्गत विकसित ड्राय कॅप तंत्रज्ञान उत्पादन आहे. त्यांना हानिकारक असणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी अनेक पटींनी प्रभावी असल्याचे देखील आढळून आले आहे. या उत्पादनाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पिकांचे नुसते कीटकांपासून रक्षण करते असे नव्हे तर कीटकांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी देखील हे वापरले जाऊ शकते. हे उत्पादन प्रति एकर 270 ते 300 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

ब्लॅक बेल्ट हे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले असून किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. हे उत्पादन जलदपणे क्रिया करते व दीर्घकाळ नियंत्रण करण्यास सक्षम आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील ते सुरक्षित असून ते त्याचे कोणतेही अवशेष सोडत नाही आणि मानवाला देखिल अनुकूल आहे.

नक्की वाचा:Loan Process:गाई-म्हशी खरेदी करायचे असतील अन पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 'अशा' पद्धतीने मिळते कर्ज

English Summary: the production of sumeel blackbelt give protection to crop from insect Published on: 12 August 2022, 05:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters