नवीन कापूस हंगामाला सुरुवात झाली आहे. होडल मंडीत कापसाला प्रति क्विंटल 10,800 रुपये भाव मिळतो आहे, ही समाधानाची बाब आहे.1) विशेष म्हणजे, हा दर अमेरिका व इतर कापूस उत्पादक देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली म्हणून मिळत नाही. सन 202-22 च्या कापूस हंगामात 365 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज सरकारी संस्थांनी व्यक्त केला
होता.जून 2022 मध्ये हा अंदाज 315 लाख गाठींवर आला.In June 2022, this estimate came to 315 lakh bales.वास्तवात 285 लाख गाठी कापूस बाजारात आला.या वर्षात कापसाचे उत्पादन घटले आहे. देशांतर्गत कापसाचा वापर व मागणी ही किमान 345 लाख गाठींची आहे.2) सन 2022-23 च्या हंगामात कापसाचे उत्पादन आणखी घटणार असून वापर व मागणी वाढणार आहे.3) मागच्या हंगामात कापसाचे दर कमी करण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता.
या दबावाला बळी पडून सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत शून्य केला आहे.4) या काळात कापूस आयात करण्याचे सौदे झाले आणि रुपयाचे अवमूल्यन व्हायला लागले. त्यामुळे आयात कापूस महाग पडत असल्याने हे सौदे रद्द केले जात आहेत.5) कापूस वर्ष 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या तारखेपर्यंत सरकारला कापसाचा क्लोसिंग स्टॉक किमान 80 लाख गाठीचा दाखवायचा आहे.6) परिस्थिती विरोधात केल्याने कापसाला सध्या चांगला दर मिळतो आहे.
7) सरकार व दक्षिण भारतातील कापड उद्योजक कापूस उत्पादकांचे विरोधक आहेत. त्यांना महागात कापूस नको आहे. त्यामुळे कापसाचे दर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.8) कापसाचा खरा हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यावर्षी अती पावसामुळे कापसाचे उत्पादन आणखी घटणार आहे. कापसाला किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची मुळीच घाई करू नये. कापूस टप्प्याटप्प्यात विकावा.
सुनील एम. चरपे.
Share your comments