आजची राजकीय व्यवस्था, व तिचा राज्यकारभार , घटनाक्रम हा शेतकरी, शेतमजुरांना चहूबाजूंनी लूटणारा तयार झाला ?, अशा राजकीय व्यवस्थेत, सत्तेसोबत गोट्या खेळणारे अपक्ष आमदार शेतकऱ्यांचे नेते होऊ शकतील काय? ज्यांना आर्थिक धोरणाचा, शेती विषयक अभ्यासाची माहिती नाही. फक्त सातबारा नावाने असलेले हे शेतकरी नेते आहेत. ते फक्त कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे अपक्ष नेते आहेत. शेतकऱ्यांचे खंबीर नेते, शेतकऱ्यांच्या आर्थिक धोरणाचा व शेतकरी हिताचा खरा विचार मांडणारे, ध्येयवादी लोकनेते, माननीय रघुनाथ दादा पाटील.
हेच आज एकमेव महाराष्ट्राचे शेतकरी नेते आहेत. आजचे सत्तेतील अपक्ष आमदार, हे शासनाला मदत करून शेतकऱ्यांचे व
शेतमजुरांचे शोषण करीत आहेत. तसेच शासनाच्या तिजोरी वर बसलेले दुतोंडी साप आहेत. अपक्ष आमदारांच्या शेतकरी चळवळी म्हणजे , त्यांच्या स्वहितासाठी राबविलेल्या स्टंटबाजी व नाटक कंपन्या आहेत.
या देशात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल यांना काही लेण देणे राहिले नाही.
ते स्वतः सत्तेत सामील होऊन शेतकरी आत्महत्या घडवीत आहेत. सत्ता ही त्यांची स्वउपयोगासाठी वापरलेली स्वतंत्र व्यवस्था आहे.तसेच या नेत्यांना आजच्या राज्यकर्त्यांनी वापरून घेण्यासाठी , तयार केलेले भाडोत्री नेते आहेत. त्यांच्यापासून शेतकरी व शेतमजूर यांनी सावध व्हावे. व शेतकरी संघटनेच्या चळवळीला, बळकटी येण्यासाठी, देशाला शेतकरी आत्महत्याचा
कलंक मिटविण्यासाठी, शेतकऱ्यांचे कैवारी- श्री रघुनाथ दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरतेणे सर्वांनी उभे राहावे.
रघुनाथ दादा पाटील व त्यांची शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी,लोक चळवळीसाठी गेल्या 40 वर्षांपासून शासनाच्या विरुद्ध खंबीरतेने, सतत लढा देत आहे. शेतकऱ्यांचेआर्थिक जीवन साफल्यवान बनविण्यासाठी, या लढ्यात शेतकरी क्रांतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे. ही विनंती.
काँग्रेस , बीजेपी हटावो ,भारत देश बचाओ,
भारत देश का किसान बचाओ
शेतकरी संघटना जिंदाबाद.
जय बळीराजा, जय हिंद, जय भारत .
आपला नम्र - धनंजय पाटील काकडे
विदर्भ प्रमुख -शेतकरी संघटना.9890368058.
Share your comments