सहाजिकच जमिनीचा पोत टिकण्यास आपोआप मदत होत असे. अन्नधान्याची गरज जशी वाढू लागली, तसा जमिनीतून अधिकाधिक उत्पादन काढण्याकडे कल वाढत गेला. त्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच संकरित वाणांचा वापर वाढत गेला. या वाणांमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठया प्रमाणात सुरू झाला. सिंचनाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या. सर्व हंगामात पिके घेतली जाऊ लागली. बागायत क्षेत्रात पिके घेताना आंतरपिके, दुबारपिके, इत्यादी पीक पद्धती पुढे आल्या. पर्यायाने पीक घनता वाढली. याच क्षेत्रातून अन्नद्रव्यांचे जास्तीत जास्त शोषण सुरू झाले. त्यातच सध्या रासायनिक खतांच्या किंमती लक्षणीयरीत्या वाढत असून जमिनीची अन्नद्रव्यांची गरजसुध्दा वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा कमी किंमतीत जी खत उपलब्ध होतील. ती जमिनीत टाकण्याकडे कल वाढत आहे. मूलद्रव्यांच्या असमतोल वापरामुळे मूलद्रव्यांची जमिनीत कमतरता जाणवू लागली आहे.
जमिनीला पुरविण्यात येणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एखादेच अन्नद्रव्य पुरवून जमिनीत सुपीकता वाढत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची मात्रा देऊनही अलीकडे उत्पादकता वाढीस मर्यादा येत आहेत. रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय खताचा अभाव आणि रासायनिक खतांचा आणि पाण्याचा बेसुमार वापर या सर्व कारणांमुळे नैसर्गिक जमिनीचे नैसर्गिक गुणधर्माची झालेली हानी. यामुळे जमिनीमधील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण घटत असून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच जमिनीमधील उपयुक्त जीव जिवाणूंची संख्या घटत आहे.
रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृतावस्था झाल्या. पर्यायाने खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा दृष्टचक्रात आधुनिक उत्पादन पध्दती अडकलेली आहे. या सगळयांचा परिणाम म्हणून उत्पादन खर्च ही वाढला
आणि दुसरीकडे उत्पादना मधे भलीमोठी वाढ झाली नाही आणि पर्यायाने आपली शेती तोटयात जाण्यास मदत झाली.हेच ते मुख्य कारण हे मला माझ्या के व्ही के घातखेडच्या टीम ने बांधावर वेळोवेळी त्यांनी समजावून सांगितले आणि आपल्या ला जमीन आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शेणखताचा वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळणे, रासायनिक खतांच्या चुकीच्या मात्रा व त्या देण्याची अयोग्य पध्दती टाळणे, पाण्याचा योग्य वापर पाण्याचा अतिवापर टाळावा. ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पध्दतीचा वापर, पिकांच्या शास्त्रोक्त पद्धतीने फेरपालट, पिकांच्या शेतातील शिल्लक अवशेषांचा नाश करणे, तणांचा वाढणारा प्रादुर्भाव टाळणे, शेतातील मातीचे परीक्षण करणे व माती परिक्षण अहवालानुसार खतांची मात्रा देणे, आदि बाबींकडे लक्ष देण्यास सांगितले.शेती मधे काही नविन करणे काळाची गरज आहे.जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची देणगी आहे.
जमिनीचे गुणधर्म टिकविणे किंबहुना सुधारणे आणि उत्पादन क्षमता टिकविणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून निसर्गाची हानी करणारी किंवा निसर्गाचा समतोल बिघडविणारी कोणतीही प्रक्रिया आपल्या शेती व्यवस्थापनातून बाद केली पाहिजे.हे सर्व लक्षात राहणं गरजेचं आहे मंडळी.
Share your comments