1. कृषीपीडिया

शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.

आपण शेतीत काय पिकवतो त्याला महत्त्व आहे का त्यापेक्षा बाजारात काय विकल्या जाते यावर जरा अभ्यास करून शेती केली तर माणूस जीवनात यशस्वी होतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.

शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो.

म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून शेतीवरच आधारीत व्यवसाय करा. कच्चा माल पण आपलाच व्यवसाय पण आपलाच.मग पहा कशी प्रगती होईल. त्यासाठी शिकावं लागेल, शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज आहे. शेतात आंब्याची बाग आपली आंब्याच्या रस म्हणून विकला व माजा वाला श्रीमंत झाला. 

आपल्याला ते जमलंच नाही. सोयाबीन आपण पिकविली तेल विकून भलतेच लोक श्रीमंत झाले. ऊस आपण पिकवला साखर विकून भलतेच लोक श्रीमंत झाले. संत्र्याच्या बागा आपल्या संत्री आपण पिकवली दारू बनवून भलतेच लोक श्रीमंत झाले. भाजीपाला आपण पिकवला पण व्यापारी कधी बनू शकलो नाही.

कांदा 80 रु किलो, टमाटर 80 रू किलो झाला तेव्हा किती शेतकऱ्यांना फायदा झाला. अजिबात नाही, कारण काय तर आपण वडिलोपार्जित शेती करीत आहोत पिकवलेली उत्पादने कशी विकायची त्यावर आधारित व्यवसाय कसा करायचा हे शिकलोच नाही  शेतीवर आधारित फूड प्रोसेसिंग Business कड़े

कधी आपण लक्ष दिले नाही आता पूर्वजांनी ज्या चूका केल्या त्या करायच्या नाही शिक्षण घ्यायचं व शेती करायची त्यावर आधारित व्यवसाय करायचा व स्वयंपूर्ण व्हायचं. शेती हा सुद्धा एक बिझनेस आहे व तो आम्हाला करता येतो सरकारला भीक मागायची वेळ येऊ द्यायची नाही. करून दाखवू प्रत्येक शेतकऱ्यांनी ही शपथ घ्यायला पाहिजे.

English Summary: The man who knows what he sells in the market is more successful in life than what he grows in the field. Published on: 14 May 2022, 11:59 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters